BBF Method: जाणून घ्या रूंद वरंबा सरी (बी.बी.एफ.) पेरणी पद्धती तंत्रज्ञानाचे फायदे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीच्या प्रगतशील पद्धतीत बी.बी.एफ. (BBF Method) म्हणजेच रूंद वरंबा सरी पेरणी पद्धत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ याचा सामना शेतकरी (Farmer) करत असतात आणि याचाच परिणाम पिकांवर होऊन उत्पादनात घट होते. अशावेळी पडणार्‍या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षितपणे निचरा करणे, उत्पादन वाढीसाठी रुंद वरंबा सरी (BBF Method) लागवड पद्धत फायदेशीर ठरते.

बी.बी.एफ. पेरणी पद्धत म्हणजे काय? (BBF Method)

हे ट्रॅक्‍टर चलित पेरणी पद्धत (Tractor Driven Sowing Method) असून याद्वारे रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पेरणी आणि खते देणे अशी तिन्ही कामे एकाच वेळी केली जातात. यामध्ये दोन फाळ आणि पेरणीचे फण यातील अंतर गरजेनुसार कमी जास्त करता येते. तसेच सऱ्यांची रुंदीही कमी जास्त करता येते. उदा. वरंब्यावर सोयाबीन (Soybean Crop) पिकाच्या 3 ते 4 ओळी 30 सें. मी. किंवा 45 सें. मी. अंतरावर 3 ओळी घेता येतात. फाळामध्ये तयार होणार्‍या सऱ्यांची रुंदी 30 ते 45 सें. मी. गरजेनुसार ठेवता येते. कोरडवाहू शेतीमध्ये (Dryland Farming) जल संधारणाच्या दृष्टीने बीबीएफ पद्धत अतिशय उपयुक्त आहे. तसेच अधिक व सततच्या पावसामध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने बीबीएफ (BBF Method)  पद्धत उपयोगी आहे. या पद्धतीमुळे सर्वसाधारणपणे 20 ते 27 टक्क्यांपर्यंत जलसंधारण तर 25 टक्के उत्पादनात वाढ दिसून आली आहे.

बी.बी.एफ. पेरणी पद्धतीचे फायदे (BBF Method)

  • बीबीएफ पेरणी (BBF Planter) यंत्राच्या सहाय्याने उतारास आडवी पेरणी केल्यास मुलस्थानी जलसंधारण होते.
  • या पद्धतीत कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या (Water Conservation) दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. पावसाच्या दीर्घकालीन खंड काळात याचा लाभ होतो.
  • आंतरपीक (Inter Cropping) पद्धतीचा अवलंब करून अधिकचे उत्पन्न घेता येते.
  • बीबीएफ पद्धतीने (BBF Method) निविष्ठा खर्चात (बियाणे, खते इ.) 20 ते 25% बचत होते.
  • खते व बियाणे एकाच वेळी पेरल्यामुळे खताचा कार्यक्षम वापर होतो.
  • उत्पन्नामध्ये 25 ते 30% वाढ  होते.
  • वरंब्यावर ओलावा टिकवून ठेवला जात असल्याने पर्जन्यमान खंडाच्या कालावधीत सुध्दा पाण्याचा ताणाची तीव्रता कमी होते.
  • जास्त पर्जन्यमान झाल्यास या पद्धतीमधील सरीमधून अतिरिक्त पाणी वाहून (Water Drainage) जाण्यास मदत होते.
  • पिकास मुबलक हवा सूर्यप्रकाश मिळाल्याने पिकांची जोमदार वाढ होऊन पीक कीड रोगास (Crop Diseases And Pest) बळी पडत नाही.
  • पिकांमध्ये आंतर मशागत करणे उभ्या पि‍कांस सरी मधून ट्रॅक्‍टर/मनुष्य चलीत फवारणी यंत्राव्‍दारे किटकनाशक फवारणे शक्‍य होते.
  • या पध्‍दतीचा अवलंब केल्याने जमिनीची धूप (Soil Erosion) कमी प्रमाणात होऊन सेंद्रिय कर्बाचा –हास थांबल्याने जमिनीची जलधारण क्षमता (Water Holding Capacity) वाढते.
  • या पध्‍दतीमुळे जमिनीची सच्छिद्रता वाढून जमीन भुसभुशीत होते. परिणामी पिकांची वाढ उत्तम होते.
  • तण नियंत्रण (Weed Control) व आंतर मशागतीच्या दृष्टीने ट्रॅक्टरचलित बीबीएफ (BBF Method) यंत्राचा वापर करता येतो. यामध्ये पेरणीचे फण काढून तेथे अंतरमशागत  आणि तण नियंत्रणासाठी व्ही, आकाराची पास बसविता येते तसेच सरीमध्ये रिजर ठेवून आंतरमशागत होते.
error: Content is protected !!