Bee Keeping : मधमाशांमुळे पिकांच्या उत्पादनात 40 टक्क्यांपर्यंत वाढ होते – पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आहारातील एक तृतीयांश भाग हा पिकांच्या परागीभवनाद्वारे मिळत असतो. मधमाशांमुळे (Bee Keeping) होणाऱ्या परागीभवनाद्वारे पीक उत्पादनात 5 ते 40 टक्के वाढ होते. त्यामुळे मधमाशांबद्दल जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राहुरी कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सी. एस. पाटील यांनी केले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित मध महोत्सवातील ‘शेती व मधमाशापालन’ (Bee Keeping) या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.

कीडनाशकांचा वापर टाळावा (Bee Keeping Increase Crop Yield)

मधमाशांद्वारे परागीभवनाची (Bee Keeping) प्रक्रिया होण्यासाठी राज्यात नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थिती पूरक आहे. कीडनाशकांचा अतिरेकी वापर मधमाशांसाठी घातक ठरत आहे. पण त्याशिवाय मधामध्ये कीडनाशकांचा अंश आढळून येत आहे, हे जास्त धोकादायक आहे. किडनाशक मंडळाने 329 किडनाशके प्रमाणित केली आहेत. तीच शेतकऱ्यांनी वापरावीत. कीडनाशकांमुळे मधमाशा नष्ट होत आहेत. त्यांना वाचवायचे असेल, तर कीडनाशकांचा कमी वापर करून सेंद्रिय शेतीकडे वळावे. याशिवाय कीटकनाशकांचा वापर टाळत उत्पादनांची गुणवत्ता राखून, उत्पन्न अधिक पौष्टिक होते, असेही संशोधनात पुढे आले असल्याचे डॉ. सी. एस. पाटील यांनी म्हटले आहे.

परागीभवनामुळे नैसर्गिक समतोल

सातारा जिल्ह्यातील बोरगाव येथील स्वाती गुरवे ठाणे जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र कोसवाड येथील उत्तम सहाणे हे देखील या परिसंवादात सहभागी झाले होते. स्वाती गुरवे यांनी म्हटले आहे की, विविध फळे, भाज्या, धान्य, तेलबिया आणि इतर पिकांमध्ये परागीभवनाची प्रक्रिया होते. निसर्गाचा जैविक समतोल साधण्याची किमया परागीभवनात असते. यात सर्वात जास्त हातभार हा मधमाशांचा असतो. तेलवर्गीय मोहरीत 43 टक्के, सूर्यफुलात 32 ते 48 टक्के, करडईत 28 टक्के, तीळ 22 ते 37, सोयाबीन 19 टक्के, एरंडी 30, जवस 17 ते 40, नायगर 22 टक्के उत्पादन वाढ झाल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. असे गुरव यांनी म्हटले आहे.

मधमाशांच्या मुख्य जाती

उत्तम सहाणे यांनी म्हटले आहे की, मधमाशी अर्धा ते एक किलोमीटर भागात फिरून एक पोळी तयार करते. फुलोरी मधमाशी ही परागीभवणासाठी अत्यंत उपयुक्त असते. मधमाशीचे एक पोळे नष्ट करणे म्हणजे त्या शेत शिवारातील उभे पिक नष्ट करण्यासारखे आहे. तसेच आग्या पोळ्यामध्ये पन्नास हजार ते एक लाख मधमाशा असतात. जाळ करून किंवा धूर करून माशा उडवल्या आणि मध काढला तर जवळपास २५ एकर मधील जंगल नष्ट होते. त्यामुळे मध काढण्याची शास्त्रीय पद्धत अवलंबवावी. असेही त्यांनी म्हटले आहे. आग्या माशी, फुलोरी माशी या जंगली मधमाशा आहेत. तर सातेरी, मेलीफेरा आणि ट्रायगोना कोती या पेटीत पाळता येणाऱ्या मधमाशा असतात.

error: Content is protected !!