Beekeeping Attack : धक्कादायक बातमी! शेतमजुरांवर मधमाशांनी केला हल्ला; 5 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Beekeeping Attack : शेतकऱ्यांना शेती करताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. यामध्ये जंगली जनावर असेल किंवा अन्य काही आपत्ती असेल या सर्व संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावाच लागतो. दरम्यान सध्या देखील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कुराडी गावातील शेतमजुरांवर मधमाशांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.

पाच मजुरांचा मृत्यू

मधमाशांच्या हल्ल्यामध्ये पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर अजून पाच जण गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे तेथील परिसरात भीतीदायक वातावरण पसरले आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वत्र भात लावण्याचे काम सुरू आहे. कुऱ्हाडी गावचे रहिवासी शेतकरी लक्ष्मण पटेल यांच्या शेतात भात लावण्याचे काम सुरू असताना शेतातील भात लावणी परतत होते. यावेळी अचानक मधमाशांनी हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये पाच शेतमजुरांचा मृत्यू झाला. (Beekeeping Attack 🙂

त्याचबरोबर या हल्ल्यामध्ये काही शेतमजूर गंभीर जखमी देखील झाले आहेत. त्या जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघातामुळे सरकारने मदत करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मधमाशांचा हल्ला हा गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत बसत नाही मात्र अजून कोणत्या सरकारी योजनांमध्ये हे बसून मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळावी असे प्रयत्न गोरेगावचे तहसीलदार करत आहेत. या घटनेमुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतीकामासाठी घराबाहेर पडावे की नाही हा त्यांच्या समोर मोठा प्रश्न उपस्थित राहिला आहे.

error: Content is protected !!