Bharat Rice: सर्वसामान्यांसाठी बाजारात उपलब्ध होणार 29 रुपये किलो दराचा ‘भारत तांदूळ’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: वाढत्या महागाईवर नियंत्रण करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे प्रयत्न केले जातात. असाच एक तांदळाच्या (Bharat Rice) बाबतीत केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी ‘भारत राइस’ (Bharat Rice) ब्रँड अंतर्गत तांदूळ किरकोळ बाजारात 29 रुपये किलो दराने विकण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. तांदूळ व्यापाऱ्यांना देखील तांदळाच्या साठ्याची माहिती देण्यात आली आहे.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तांदूळ विकला जाणार (‘Bharat Rice’ on the e-commerce platform)

तांदळाच्या विविध जातींच्या निर्यातीवर बंदी असतानाही गेल्या वर्षभरात तांदळाचे किरकोळ आणि घाऊक बाजारातील दर (Rice Rate)15 टक्क्यांनी वाढले आहेत.तांदळाच्या वाढलेल्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने दोन सहकारी संस्था नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NAFED) आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NCCF) तसेच किरकोळ साखळीद्वारे किरकोळ बाजारात उत्पादनाची विक्री सुरू केली आहे. केंद्रीय भंडार अनुदानित ‘भारत तांदूळ’ (Bharat Rice) 29 रुपये प्रति किलो दराने विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही भारत तांदूळ विकला जाणार आहे, असं संजीव चोप्रा यांनी सांगितले आहे.

भारत तांदूळ पुढील आठवड्यापासून बाजारात 5 किलो आणि 10 किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यात सरकारने पाच लाख टन तांदूळ किरकोळ बाजारात विक्रीसाठी दिला आहे. यासोबतच  सरकार आधीपासून भारत आटा 27.50 रुपये प्रति किलो आणि भारत डाळ (चन्ना) 60 रुपये किलो दराने विकत आहे. बाजारातील अफवा दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तांदूळ निर्यातीवरील बंदी उठवण्याची सरकारची सध्या कोणतीही योजना नाही. भाव खाली येईपर्यंत निर्बंध कायम राहतील, असे चोप्रा यांनी सांगिलते आहे.

गरज भासल्यास तांदळाच्या साठ्याची मर्यादा ठरवू

तांदळाच्या साठ्यावर सरकार मर्यादा घालणार का, असे विचारले असता चोप्रा म्हणाले की, भाव कमी करण्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत. गरज भासल्यास तांदळाची साठा मर्यादा निश्चित करण्याचा विचार सरकार करेल, असे त्यांनी म्हटले आहे. तांदूळ वगळता सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात आहेत. तांदळाच्या किमतींवर लक्ष ठेवण्यासाठी, किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते आणि प्रक्रिया करणाऱ्यांना सरकारकडून पुढील शुक्रवारपासून सरकारी पोर्टलवर विविध श्रेणींमध्ये त्यांचा साठा जाहीर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तांदूळ बासमती असो की नॉन-बासमती किंवा परतून केलेला आणि तुटलेला तांदूळ (Bharat Rice) असो, व्यापाऱ्यांना तो सरकारी पोर्टलवर जाहीर करावा लागणार आहे.

error: Content is protected !!