Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana: भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना: फळबाग लागवडीसाठी 100 टक्के अनुदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना (Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana) 2018 -19 पासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना लाभ देण्यात येणार आहे. ही योजना Agriculture Scheme) शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच या योजनेच्या (Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana) माध्यमातून पशुधन व पीक याबरोबरच फळबाग शेतीला ही प्रोत्साहन मिळणार आहे.  

योजनेची वैशिष्ट्ये (Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana)

  • या योजनेत लाभ घेणार्‍या मंजूर अनुदान पहिल्या वर्षी 50%, दुसर्‍या वर्षी 30% आणि तिसर्‍या वर्षी 20% अशा तीन वर्षात मंजूर अनुदान देण्यात येणार आहे.
  • लाभार्थी शेतकर्‍याने दुसर्‍या व तिसर्‍या वर्षाच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जि‍विताचे प्रमाण बागायती झाडांसाठी 90% तर कोरडवाहू झाडांसाठी 80% असणे गरजेचे आहे.
  • हे प्रमाण जर कमी झाल्यास शेतकर्‍याने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे गरजेचे आहे. अशाप्रकारे शेतकर्‍याला 100% अनुदान 3 वर्षात फळबाग लागवडीवर मिळणार आहे .
  • अल्प, अत्यल्प भूधारक, महिला आणि दिव्यांग शेतकर्‍यांना या योजनेत प्राधान्य दिले गेलेले आहे.
  • या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेण्यासाठी शेतकरी कोंकण विभागात कमीत कमी 10 गुंठे तर जास्तीच जास्त 10 हेक्टर तर इतर विभागात कमीत कमी 20 गुंठे तर जास्तीच जास्त 6 हेक्टर क्षेत्र मर्यादेत लाभ घेऊ शकतो.
  • या योजनेचा लाभ अनुसूचित जाती जमाती आणि इतर शेतकर्‍यांना घेता येईल.

आवश्यक पात्रता आणि कागदपत्रे (Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana)

  • लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच बसविणे आवश्यक आहे.
  • सर्व प्रवर्गा अंतर्गत ज्या शेतकर्‍यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकर्‍यांचा विचार करण्यात येईल. (कुटुंबाची व्याख्या: पती, पत्नी, व अज्ञात मुले)
  • लाभ वैयक्तिक शेतकर्‍यांना देय आहे. संस्थात्मक लाभार्त्यांना या योजनेचा लाभ देय नाही.
  • शेतकर्‍याचा स्वत:च्या नावावर 7/12 असणे गरजेचे आहे. संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकर्‍यास स्वत:च्या हिश्याच्या मर्यादेत लाभ घेता येईल.
  • 7/12 वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती असणे आवश्यक आहे.
  • परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम 2006 नुसार वन पट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.
  • इतर शासकिय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकर्‍यास लाभ घेता येईल.

अर्ज दाखल करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या खालील लिंकवर क्लिक करा भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना

error: Content is protected !!