भेंडीला दर मिळत नसल्याने शेतकरी हतबल; उभ्या पिकात सोडली जनावरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Agriculture News : सध्या टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादकता शेतकरी आनंदी आहे. टोमॅटोचे दर गगनाला भिडले असले तरी बाकी शेतमालाचे दर अजूनही कमीच आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणचे शेतकरी निराश आहेत. भेंडीचे दर कमी झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कारण भेंडी तोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट लागते मात्र जर कष्ट करूनही योग्य भाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांसमोर मोठं संकट येत.

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप येथील एका शेतकऱ्याने ३५ गुंठे क्षेत्रामध्ये भेंडीची लागवड केली होती. यासाठी त्या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात खर्च देखील झाला होता. मात्र भेंडीला दर नसल्याने खर्चही निघत नाही त्यामुळे या शेतकऱ्यावर पिक काढून टाकण्याची वेळ सध्या आली आहे. भगवान देवकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

या शेतक-याने 35 गुंठ्यांमध्ये भेंडीचे उत्पन्न घेतले आहे. त्यामुळे भेंडीचे दोन लाख रुपये व्हावेत अशी शेतकऱ्याची अपेक्षा होती मात्र भेंडीला प्रति किलो 7 रुपये ते 15 रुपया पर्यंत किलोला दर मिळत असल्याने यातून खर्च देखील निघत नाही त्यामुळे शेतकऱ्याने पोटच्या पोरासारखा जपलेल्या उभ्या पिकत मेंढर सोडली आहेत. आज पिकाला भाव नसल्यानेमुळे या शेतकऱ्याने उभ्या पिकात मेंढ्या सोडल्या आहेत. त्यामुळे या शेतकऱ्याचे जवळपास ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या’ ठिकाणी पाहा भेंडीचे दर

तुम्हालाही घरबसल्या भेंडी व इतर शेतमालाचे भाव पाहायचे आहेत का? तर मग लगेचच प्लेस्टोअरवर जा आणि Hello Krushi हे आपले अँप डाउनलोड करा यामध्ये तुम्हाला रोजचे ताजे बाजारभाव पाहायला मिळतील ते ही अगदी मोफत. त्यामुळे लगेच प्लेस्टोअरवर जा आणि आपले Hello Krushi हे आपले अँप इंस्टाल करा.

error: Content is protected !!