Biodegradable Thermocol: मशरूम आणि कृषी कचऱ्यापासून ‘बायोडिग्रेडेबल थर्माकोल’ निर्माण करणारा पर्यावरणप्रेमी उद्योजक!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या पर्यावरणाच्या (Biodegradable Thermocol ) संवर्धनाऐवजी बहुतेक लोक सोयींना प्राधान्य देतात. यामुळे पर्यावरणाचे आणि पर्यायाने मानव जातीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. परंतु काही पर्यावरणप्रेमी असेही असतात जे त्यांच्या कार्यातून एक उदाहरण समोर ठेवतात. कानपुर येथील चैतन्य दुबे हा असाच एक उद्योजक आहे ज्याने पारंपारिक हानिकारक थर्माकोलला पर्याय म्हणून बायोडिग्रेडेबल थर्माकोल (Biodegradable Thermocol) तयार केले आहे.

पारंपारिक थर्मोकोलला पॉलिस्टीरिन फोम म्हणून देखील ओळखले जाते, वजनाने हलके आणि इन्सुलेट गुणधर्मांमुळे मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. त्याच्या अष्टपैलु गुणांमुळे पॅकेजिंग साहित्यापासून (Packaging Material) ते शालेय प्रकल्पांपर्यंत विविध उद्योगांमध्ये वापरले जाते. परंतु हे थर्माकोल पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहे. हे नॉन-बायोडिग्रेडेबल पॉलिस्टीरिनपासून (Non-Biodegradable Polystyrene) बनलेले थर्मोकोल प्रदूषण तर वाढवतेच शिवाय योग्यरित्या विल्हेवाट न लावल्यास निसर्गासाठी सुद्धा हानिकारक (Harmful) आहे.  

या समस्येवर उपाय म्हणून चैतन्यने एक टिकाऊ पर्याय शोधण्यास सुरुवात केली जी केवळ थर्माकोलचे दोष दूर करत नाही तर अतिरिक्त फायदे देखील देते (Biodegradable Thermocol).

बायोडिग्रेडेबल थर्माकोल’ निर्मिती (Biodegradable Thermocol)

मशरूम मायसेलियम (Mushroom Mycelium), कृषी कचरा (Agriculture Waste) आणि नैसर्गिक तंतू (Natural Fiber) एकत्र करून चैतन्यने एक पर्यावरणपूरक थर्माकोल विकसित केले आहे. हे पर्यावरणपूरक (Eco-Friendly Technology) थर्माकोलमध्ये पारंपारिक थर्माकोल सारखीच ताकद आणि टिकाऊपणा आहे.

हा बायोडिग्रेडेबल थर्माकोल (Biodegradable Thermocol) दुहेरी उद्देश पूर्ण करतो. पॅकेजिंग सामग्री म्हणून वापरून झाल्यावर विल्हेवाट लावताना हा थर्माकोल खत (Thermocol Fertilizer)  म्हणून सुद्धा वापरता येतो. यामधून मातीला पोषकतत्वे मिळतात जी वनस्पतींच्या वाढीस चालना देतात.

पारंपारिक थर्माकोलच्या विपरीत, हे पर्यावरणास अनुकूल उत्पादन टिकाऊ आहे, यामुळे माती समृद्ध होते शिवाय हरित पृथ्वीचे ध्येय साध्य करण्यास मदत करते. 

चैतन्य म्हणतो, “मला मशरूमची शेती (Mushroom Farming) आणि पर्यावरणपूरक साहित्य तयार करण्याची त्याची क्षमता याबद्दल उत्सुकता निर्माण झाली, आणि त्यातून माझा शोध आणि नवनिर्मितीचा प्रवास सुरु झाला.”

मशरूम लागवडीबद्दलच्या आकर्षणामुळे चैतन्यने विशेष प्रशिक्षण घेऊन शेतीचे तंत्रज्ञान सुद्धा समजून घेतले. यासाठी चैतन्यने डीएमआर सोलन येथे मशरूम लागवडीच्या कोर्समध्ये प्रवेश घेतला. या कोर्समुळे मशरूम लागवड आणि बायो-थर्मोकोलच्या (Biodegradable Thermocol) नाविन्यपूर्ण वापर याविषयी त्याने ज्ञान आणि कौशल्ये मिळविले.

त्याच्या संपूर्ण उद्योजकीय प्रवासात, चैतन्यला त्याचे मित्र, कुटुंब आणि मार्गदर्शक यांची भक्कम साथ मिळाली. “माझ्या कल्पना शक्तीवर त्यांनी ठेवलेल्या विश्वासामुळेच मला आव्हानांवर मात करता आली” असे तो अभिमानाने सांगतो.

चैतन्यची ही नवनिर्मितीची कथा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्याची सर्जनशीलता आणि बदल घडवण्याची इच्छा पर्यावरणासाठी (Biodegradable Thermocol) सुद्धा उपयुक्त आहे हे विशेष.  

error: Content is protected !!