Biological Pest Control: परोपजीवी कीटक करतील पिकांवरील हानिकारक किडींचे नियंत्रण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त जैविक कीड नियंत्रण (Biological Pest Control) ही काळाची गरज झालेली आहे. रासायनिक कीटकनाशकाचा अनियंत्रित वापरामुळे हानिकारक किडीमध्ये प्रतिकार क्षमता निर्माण होत आहे, तसेच या रासायनिक कीटकनाशकामुळे पिकांचे सुद्धा नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत परोपजीवी मित्र कीटकांची ओळख आणि संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. परोपजीवी (Parasitoids Insects) हे मित्रकीटक नुकसानकारक किडींपेक्षा आकाराने लहान असतात. ते किडीच्या अंगावर किंवा शरीरामध्ये राहतात. किंवा किडींच्या शरीरामध्ये, शरीरावर अंडी घालून तिला हळूहळू खातात. आजच्या लेखात जाणून घेऊ या जैविक कीड नियंत्रणासाठी (Biological Pest Control) वेगवेगळे परोपजीवी कीटक आणि त्यांची उपयुक्तता.

परोपजीवी कीटकांचे प्रकार (parasitoids insects)

  • ट्रायकोग्रामा (Trichogramma)

या परोपजीवी कीटकाचा उपयोग ऊस, भात, मका, ज्वारीवरील खोडकिडी, कांडी कीड, कपाशी वरील बोंडअळी, भाजीपाला पिकांवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, घाटे अळी, डाळिंबावरील सुरसा, कोबीतील चौकोनी ठिपक्याचा पतंग इ. किडींच्या (Biological Pest Control) नियंत्रणासाठी होतो.

प्रसारण मात्रा: एका ट्रायकोग्रामा कार्डवर सुमारे 20 हजार परोपजीवीयुक्त अंडी असतात. अशा ट्रायकोकार्ड्सचे 2 ते 4 प्रति एकर प्रमाणात तर प्रौढांचे 20,000 प्रौढ/एकर याप्रमाणे प्रसारण करावे. किडीच्या प्रादुर्भावानुसार आठवड्याच्या अंतराने 4 ते 5 प्रसारणे करावीत.

  • चीलोनस  (Chelonus)

या परोपजीवी कीटकाचा उपयोग बटाट्यावरील पाकोळी, कपाशीवरील बोंडअळी व इतर पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी होतो.

प्रसारण मात्रा: 24,000 ममीज/एकर याप्रमाणे प्रसारण करावे. गरजेनुसार 3 ते 4 प्रसारणे करावीत.

  • एनकार्शिया  (Encarcia)

हे परोपजीवी कीटक बहुतांश भाजीपाला, फळझाडे, फुलझाडे, व पॉली-हाउसमधील पिकांवरील रसशोषक किडी (पांढरी माशी, मावा, उसावरील लोकरी मावा इ.) च्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.

प्रसारण मात्रा: नुकसानकारक किडींचा प्रादुर्भाव दिसू लागताच या किटकांचे प्रसारण करावे.

  • एपिरिकॅनिया (Epiricania)

हे मित्र कीटक उसावरील नुकसान कारक पायरीला या किडीच्या पिल्ले व प्रौढ अवस्थांवर उपजीविका करतात. या कीटकांमुळे पायरीलाचे अत्यंत प्रभावी नियंत्रण होते.

प्रसारण मात्रा: 20,000 अंडी किंवा 2000 कोष/एकर. गरजेनुसार पुढील प्रसारणे करावीत.

  • अपेंटालीस /कोटेशिया (Cotesia)

भाजीपाला पिकांतील शेंडा व फळे पोखरणारी अळी, उसावरील खोडकीड, कांडी कीड, बोंडअळी, घाटेअळी इ. च्या नियंत्रणासाठी या कीटकाचा उपयोग होतो.

प्रसारण मात्रा: 20,000 प्रौढ/एकर

  • ब्रेकॉन (Brecon)

कापसावरील बोंडअळी, बटाट्यावरील पाकोळी, भेंडीवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, भात, मका व उसावरील खोडकीड, नारळावरील काळ्या डोक्याची अळी व इतर पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी या कीटकाचा उपयोग होतो.

प्रसारण मात्रा: 20,000 प्रौढ/एकर

  • कोपिडोसोमा  (Copidosoma)

हे परोपजीवी बटाट्यावरील पाकोळीच्या जैविक नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

प्रसारण: 2000 अळ्या/एकर

  • एनासियस (Anasius)

हे परोपजीवी कीटक असून मोठ्या प्रमाणावर उपद्रव करणाऱ्या पिठ्या ढेकूण (मिली बग) या किडीच्या नैसर्गिक नियंत्रणात (Biological Pest Control) मुख्य कार्य करतात.

error: Content is protected !!