Bird Flu : ‘या’ राज्यात दोन जिल्ह्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा प्रकोप; प्रशासन अलर्ट मोडवर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पोल्ट्री व्यवसाय आणि बदकपालन (Bird Flu) करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, आता दक्षिणेकडील राज्य असलेल्या केरळ या राज्यामध्ये दोन जिल्ह्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’ हा रोग आढळून आला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये संशयास्पद असलेल्या बदकांची चाचणी करण्यासाठी मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथील अत्याधुनिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यात केरळच्या दोन्ही जिल्ह्यांमधील बदकांमध्ये ‘बर्ड फ्लू’ (Bird Flu) या रोगाची लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे आता या जिल्ह्यांमध्ये बदकांची विल्हेवाट लावली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

आतापर्यंत अनेक बदकांचा मृत्यू (Bird Flu In Kerala)

एका आघाडीच्या वृत्तसमूहाला माहिती देताना केरळच्या अलप्पुझा जिल्ह्याच्या जिल्हा पशुपालन अधिकाऱ्याने याबाबात बोलताना म्हटले आहे की, बर्ड फ्लू (Bird Flu) (H5N1) मुळे काही शेतकऱ्यांना आपल्या बदकांच्या दैनंदिन हालचालींमध्ये बदल दिसून आला होता. ज्यामुळे त्यांच्या बदकांचे मृत्यू होत आहे. यात एका शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे एकूण 7500 बदक पाळलेले होते. मात्र, त्यातील जवळपास 3000 बदक आतापर्यंत मरण पावले आहेत. याशिवाय अन्य एका शेतकऱ्याने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे 2000 बदक पाळलेले होते. मात्र, त्यातील आतापर्यंत 238 बदक मरण पावले आहेत. अशा अन्य काही शेतकऱ्यांनी देखील स्थानिक पशुपालन विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.

प्रशासन अलर्ट मोडवर

संबंधीत शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर केरळमध्ये पशुपालन विभाग अलर्ट मोडवर असल्याचे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. त्यानुसार काही शेतकऱ्यांकडील बदक पक्षांचे नमुने राष्ट्रीय पशुरोग संस्था भोपाळ येथे पाठवण्यात आले होते. त्यानंतर याबाबत पशुपालन विभागाकडून ‘बर्ड फ्लू’ आढळून आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये गायींमध्ये बर्ड फ्लू (Bird Flu) रोगाची लक्षणे आढळून आली होती. विशेष म्हणजे या गायींच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यामध्ये देखील बर्ड फ्लूचे लक्षण आढळून आले होते. त्यानंतर आता केरळमध्ये बदकांमध्ये ‘बर्ड फ्लू’ची आढळून आल्याने ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

error: Content is protected !!