Birsa Munda Krushi Kranti Yojana: अनुसूचीत जमाती प्रवर्गातील शेतकर्‍यांसाठी ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (Birsa Munda Krushi Kranti Yojana) ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे जी अनुसूचित जमाती शेतकर्‍यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबवली जाते. या योजनेचा उद्देश आदिवासी शेतकर्‍यांना अधिक उत्पादन मिळवून देणे आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे हा आहे. या योजनेंतर्गत, अनुसूचित जमाती शेतकर्‍यांना नवीन विहीर खोदणे, जुनी विहीर दुरूस्ती, इनवेल बोअरिंग, वीज जोडणी आकार, पंप संच, पिव्हीसी / एचडीपीई पाईप, शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण, परस बाग, सूक्ष्म सिंचन संच या बाबींसाठी अनुदान (Birsa Munda Krushi Kranti Yojana) देण्यात येते.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनाचे उद्दिष्टे (Birsa Munda Krushi Kranti Yojana)

  • अनुसूचित जमाती शेतकर्‍यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देणे.
  • आदिवासी शेतकर्‍यांचे उत्पादन वाढवणे.
  • आदिवासी शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारणे.
  • आदिवासी शेतकर्‍यांना आत्मनिर्भर होण्यास मदत करणे.

योजनेंतर्गत अनुदान

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत, अनुसूचित जमाती शेतकर्‍यांना सिंचनासाठी विविध प्रकारच्या अनुदानांमध्ये मदत दिली जाते. हे अनुदान खालील प्रमाणे आहेत

  • नवीन विहिर खोदण्यासाठी: 100% अनुदान
  • जुन्या विहिरीची दुरूस्तीसाठी: 75% अनुदान
  • इंडक्शन पंपासाठी: 50% अनुदान
  • ठिबक सिंचनासाठी: 75% अनुदान
  • तुषार सिंचनासाठी: 75% अनुदान
  • शेततळ्यासाठी: 75% अनुदान
  • परस बागेसाठी: 50% अनुदान

लाभार्थी पात्रता

  • लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
  • शेतकरी यांचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा जास्त नसावे.
  • त्याच्या/तिच्याकडे किमान 0.20 हेक्टर व कमाल सहा हेक्टर जमीन असावी.

आवश्यक कागदपत्रे

  • अनुसूचित जमातीचा दाखला
  • जमिनीचा सातबारा व आठ-अ उतारा
  • उत्पन्नाचा दाखला
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • बँक खाते पासबुक

अर्ज कुठे करावा

अर्ज www.agriwell.mahaonline.gov.in  या संकेत स्थळावर ऑनलाईन करावा

error: Content is protected !!