BJP Manifesto 2024 : शेतकऱ्यांसाठी भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा? वाचा.. संपूर्ण यादी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी (BJP Manifesto 2024) सुरु आहे. अशातच आज (ता.14) सत्ताधारी पार्टी असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात नवी दिल्लीतील येथील भाजप मुख्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह (BJP Manifesto 2024) भाजपचे अनेक बडे नेते उपस्थित होते.

रोष कमी करण्याचा प्रयत्न (BJP Manifesto 2024)

भारतीय जनता पक्षाने आपल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात (BJP Manifesto 2024) अनेक मोठी आश्वासने दिली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील भाजप सरकारची प्रतिमा ही शेतकरी विरोधी असल्याचे चित्र तयार झाले आहे. ज्यामुळे देशभरात शेतकऱ्यांमध्ये भाजप सरकारबाबत काहीसा रोष आहे. हा रोष कमी करण्यासाठी भाजप सरकारकडून आपल्या जाहीरनाम्यात, शेतीविषयक अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

‘या’ आहेत शेतीविषयक घोषणा?

  • पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अर्थात पीएम किसान योजनेला आणखी सशक्त बनवले जाईल.
  • शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी, वेळोवेळी विविध पिकांच्या किमान आधारभूत किमतींमध्ये भरघोस वाढ केली जाईल.
  • शेतकऱ्यांना जागतिक स्तरावर सर्वात स्वस्त बियाणे, खते उपलब्ध करून दिली जातील.
  • शेतमालाच्या सरकारी खरेदीला अधिकाधिक प्रोत्साहन दिले जाईल.
  • शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यासाठी त्यांच्या धान्य साठवणुकीच्या विशेष महत्व दिले जाईल.
  • पीएम कृषी सिंचन योजनेअंतर्गत देशभरात सिंचन क्षमता वाढवली जाईल.
  • देशभरात दूध डेअरी आणि सहकारी संघांच्या संख्येत वाढ केली जाईल.
  • देशभरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी हवामानाचा अचूक अंदाज मिळावा तसेच अन्य कृषी विषयक संकटांच्या आगाऊ माहितीसाठी एक स्वदेशी उपग्रह लाँच केला जाईल.
  • देशभरातील गरीब कुटुंबाना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 5 लाख रुपयेपर्यंत निशुल्क आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
  • देशभरातील नागरिकांना पुढील पाच वर्ष मोफत रेशनद्वारे तांदूळ, गहू वाटप केले जाईल.
  • याशिवाय 70 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या प्रत्येक व्यक्तींला आयुष्यमान योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल
error: Content is protected !!