Black Minorca Chicken: अंडी उत्पादनासाठी पाळली जाणारी स्पेनची आकर्षक ‘ब्लॅक मिनोर्को’ कोंबडी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: विदेशी कोंबडीच्या (Black Minorca Chicken) दिसायला सुंदर आणि उत्साही जातींमध्ये ब्लॅक मिनोर्को’ कोंबडीला विशेष महत्व आहे. स्पेनच्या पश्चिम किनाऱ्यावरील एका सुंदर बेटावर आढळणारी मिनोर्को कोंबडी (Black Minorca Chicken) दिसायला फारच आकर्षक आहे. जाणून घेऊ या कोंबडीच्या जातीविषयी.

उगम (Black Minorca Chicken)

या कोंबडीचा उगम स्पेनच्या (Spain) मेनोर्का या भूमध्य बेटावर झाला आहे. त्यामुळे या जातीचे नाव मिनोर्को असे ठेवण्यात आले आहे. 18 व्या शतकात ब्रिटिशांनी या कोंबडीच्या जातींना दत्तक घेतले घेतलेल्या या जाती संकरित जाती (Hybrid) निर्माण होण्यापूर्वी 100 वर्षे लोकप्रिय होत्या. ही कोंबडी एके काळी पांढरे शुभ्र मोठे अंडे घालण्यासाठी प्रसिध्द होती पण इतर जातींशी संकर केल्यामुळे तिच्यातील हा गुण नाहीसा झाला.

शरीर रचना

मिनोर्का कोंबडी (Black Minorca Chicken) तिचे प्रभावशाली व्यक्तिमत्व आणि ताठ शरीर यासाठी ओळखली जाते. ही कोंबडी अभिमानी आणि दिसते. शरीराने व्हाईट लेगहार्नपेक्षा लहान असून सर्व पिसे काळेभोर असतात. चोच काळी असते, तुरा तांबडा असतो, कानाची पाळी पांढरी असून इतर कोंबड्यांपेक्षा मोठी असते. पूर्ण वाढ झालेल्या नराचे वजन 2 किलो तर मादीचे 1.5 किलो असते.  

उत्पादन (Production)

जन्मानंतर 20 आठवड्यात या कोंबड्यांना लैंगिक परिपक्वता येते. अंडी उत्पादनासाठी पाळली जाणारी ही कोंबडी वर्षभरात सरासरी 200 अंडी देते.

शरीराचा मोठा आकार परंतु दुबळी शरीराची रचना यामुळे  मांस उत्पादनासाठी या जाती कमी कार्यक्षम आहेत.

विशेषता

मिनोर्का (Black Minorca Chicken) बहुतेकदा शोभेच्या जाती म्हणून पाळल्या जातात. ही चपळ आणि लाजाळू जात आहे. मुक्त परिसरात राहणे त्यांना आवडते. या कोंबडीची चांगली वाढ होण्यासाठी योग्य काळजी आणि व्यवस्थापन आवश्यक असते.

error: Content is protected !!