Black Rice : शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले तरच शेती फायद्यात राहते. पारंपरिक पद्धतीने शेती करून चांगला नफा कमावणे आता कठीण आहे. सध्या बाजारात अनेक वेगवेगळी फळे, भाज्या आल्या आहेत. अलीकडे सामान्य माणसेही आरोग्याच्या बाबतीत खूप जास्त काळजी घेऊ लागल्याने त्यांचे आहाराकडे लक्ष असते. शेतकऱ्यांनी याच गोष्टीचा विचार करून बाजारातील गरजेनुसार वेगवेळ्या भाज्या, पिके आपल्या शेतात घ्यायला हवी आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काळ्या तांदुळाच्या शेतीबाबत माहिती सांगणार आहोत.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
कशी केली जाते काळ्या तांदळाची शेती? (Black Rice Farming)
शेतकरी मित्रांनो काळ्या तांदळाची शेती करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर नक्कीच हे तुमच्यासाठी फायदेशीर राहू शकते. यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्या. येथे तुम्हाला रोपे विक्री करण्यापासून त्याच्या लागवडीच्या पद्धतीपर्यंत सर्व माहिती मिळेल. काळ्या धनाची शेती करताना साधारण मे महिन्यात रोपे तयार करून जून महिन्यात रोपांची लागवड केली जाते. बाकी सर्व गोष्टी या सामान्य धनाप्रमाणेच कराव्या लागतात. यात महत्वाची बाब म्हणजे तुम्ही काळे तांदूळ निवडताना योग्य वाण घेतले आहे का हे पाहणे आहे.
भारतात सध्या मणिपूर, आसाम, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार तसेच इतर राज्यामध्ये काळ्या धानाची शेती केली जात आहे. महाराष्ट्रातील काही भागातही काळ्या तांदुळाची शेती अनेक शेतकरी करत आहेत. यामध्ये महाबळेश्वर येथील शेतकऱ्याने मागील वर्षी काळ्या तांदुळाचे चांगले उत्पादन घेतले होते. मात्र प्रामुख्याने ही शेती मणिपूर व आसाम या राज्यातच मोठ्या प्रमाणात होते. या तांदळामध्ये ब जीवनसत्त्व, ई जीवनसत्त्व, कॅल्शियम व लोह, मॅग्नेशियम, झिंक आणि इतर पोषक घटक असल्यामुळे या तांदळास मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे.
किती मिळतो भाव?
बाजारात या काळ्या तांदळाच्या मागणीचा विचार केल्यास 400 ते 500 रु. प्रति किलो दर आहे. त्याचप्रमाणे आपण साधा तांदूळ विकल्यास त्यास 30 ते 40 रु. प्रति किलो भाव मिळतो. या तांदुळास प्रामुख्याने इंडोनेशिया तसेच आशियाई देशांकडून मागणी जास्त आहे. भारतातही या तांदळात हळूहळू मागणी वाढत आहे, त्यामुळे इतर राज्यातील शेतकरीही या धानपिकाच्या शेतीकडे वळत आहेत. छत्तीसगढ राज्यामध्ये तर ही शेती करण्यासाठी शेतकरी प्रशिक्षण घेत आहेत. बाजारातील मागणीनुसार काळ्या धानाचे उत्पादन घेत असून या शेतकऱ्यांना तेथील सरकारही प्रोत्साहन देत आहे.