Black Soyabean : काळ्या सोयाबीनबाबत माहिती आहे का? वाचा…किती असतो भाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन हे देशातील खरीप हंगामातील प्रमुख पीक (Black Soyabean) आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांसह देशातील अनेक भागांमध्ये सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र सध्या सोयाबीनचे दर घसरलेले असल्याने, राज्यासह देशातील सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. याउलट देशातील उत्तराखंड या राज्यात काळ्या सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या काळ्या सोयाबीनला सामान्य पिवळ्या सोयाबीनच्या तुलनेत अधिकचा दर मिळतो. याशिवाय काळ्या सोयाबीनची आयुर्वेदिक महती असल्याने, डॉक्टरांकडून तिचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. याच पार्श्वभूमीवर काळ्या सोयाबीनबाबत (Black Soyabean) थोडक्यात जाणून घेऊया…

किती आहे 1 किलोची किंमत? (Black Soyabean How Much Is The Price)

तुम्हालाही पिवळ्या सोयाबीनऐवजी काळ्या सोयाबीनचे उत्पादन घ्यायचे असल्यास तुम्ही केंद्र सरकारच्या शेतकरी कृषी व्यवसाय संघाच्या (एसएफएसी) संकेतस्थळावर जाऊन त्या ठिकाणी उपलब्ध शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या (एफपीओ) माध्यमातून हे बियाणे खरेदी करू शकतात. सध्या बाजारात पिवळ्या सोयाबीनला जवळपास ४४०० रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दर मिळत आहे. अर्थात पिवळ्या सोयाबीनला १ किलोसाठी ४४ रुपये इतका दर मिळतो. याउलट १ किलो काळ्या सोयाबीनसाठी १२० रुपये मोजावे लागतात. विशेष म्हणजे सध्याच्या घडीला बाजारात काळे सोयाबीन हवे तितके उपलब्ध नाही. त्यामुळे त्यास मागणीही अधिक असते.

काळ्या सोयाबीनची वैशिष्ट्ये

काळ्या सोयाबीनच्या उपयोग आहारात प्रामुख्याने जपान, चीन, कोरिया या आशियाई देशांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. या सोयाबीनमध्ये पौंष्टिक घटकांचे प्रमाण अधिक असते. सध्याच्या घडीला भारतात उत्तराखंड या राज्यात काळ्या सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. तसेच त्या ठिकाणी या सोयाबीनचा आहारात मोठ्या प्रमाणात समावेश देखील केला जातो. ही सोयाबीन प्रामुख्याने सूप, सलाड म्हणून आहारात वापरली जाते. याशिवाय काळ्या सोयाबीनमध्ये प्रोटीन, आयर्न, फायबर, मॅग्नेशियम, आणि व्हिट्यामिन-ई यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. परिणामी, या सोयाबीनचा उपयोग आहारात करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून अनेकदा दिला जातो. ऍनिमिया या आजारासाठी ती विशेष गुणकारी मानली जाते.

error: Content is protected !!