Black Turmeric Farming : काळ्या हळदीची शेती करेल मालामाल; 500 रुपये किलो मिळतो भाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हळद म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पिवळ्या हळकुंडाचे (Black Turmeric Farming) चित्र उभे राहते. हळद हा मसाल्याचा पदार्थ असून, बाजारात त्याला नेहमीच मागणी असते. इतकेच नाही तर हळद पिकाला शेतकऱ्यांना दरही चांगला मिळतो. सध्या हळदीला राज्यातील बाजार समित्यांमध्ये सरासरी 15000 ते 17000 रूपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. आज आपण पिवळ्या हळदीपेक्षा अधिक दर मिळवून देणाऱ्या काळ्या हळदीबाबत जाणून घेणार आहोत. पिवळ्या हळदीप्रमाणे काळ्या हळदीचे (Black Turmeric Farming) अनेक औषधी गुणधर्म आहे. ज्यामुळे बाजारात तिला अधिक मागणी असते.

किती मिळतो दर? (Black Turmeric Farming)

शेतकऱ्यांना कोणत्याही पिकाचे उत्पन्न घ्यायचे म्हटले तर त्यातून उत्पन्न किती मिळते? हा पहिला प्रश्न पडतो. काळी हळद अनेक ऑनलाइन वेबसाईटवर बाजारभावात चढ-उतार लक्षात घेता, कमीत कमी 500 रुपये ते जास्तीत जास्त 5000 रुपये प्रति किलोपर्यंत विकली जाते. शेतकऱ्यांनी आपल्या एक एकर जमिनीत काळ्या हळदीची लागवड (Black Turmeric Farming) केल्यास, त्यांना त्यातून जवळपास 50 ते 60 क्विंटल ओली हळद उत्पादित होते.

किती मिळते उत्पन्न?

अर्थात वाळवून 12 ते 15 क्विंटल सुकी हळदीचे उत्पादन होते. काळ्या हळदीचे उत्पादन तुलनेने कमी होते. मात्र, तिला अधिक दर मिळत असल्याने तिच्यापासून मिळणारे एकरी उत्पन्न अधिक मिळते. 15 क्विंटल उत्पादन पकडल्यास त्याला 500 रुपये किलोचा दर मिळाला तरी शेतकऱ्यांना एक एकरातून साडे सात लाखांचे उत्पन्न हमखास मिळते. ज्यामुळे काळ्या हळदीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायद्याची मानली जात आहे.

कधी करतात लागवड?

काळ्या हळदीची लागवड (Black Turmeric Farming) ही सामान्यपणे खरीप हंगामात जून महिन्यात होते. काळ्या हळदीच्या लागवडीसाठी भुसभुशीत चिकणमाती जमिनीत चांगली मानली जाते. मात्र, ही जमीन पावसाच्या पाण्याचा निचरा होणारी असावी. लागवडीसाठी हेक्टरी सुमारे 2 क्विंटल काळ्या हळदीचे बियाणे गरजेचे असते. हळद पिकाला जास्त सिंचनाची गरज नसते. याशिवाय काळ्या हळदीवर जास्त किडींचा प्रादुर्भाव होत नाही. ज्यामुळे कीटकानाशकांवरील खर्च देखील कमी होतो. काळ्या हळदीच्या लागवडीपूर्वी शेणखताचा अधिक वापर केल्यास, भरघोस उत्पादन मिळण्यास मदत होते.

error: Content is protected !!