कृषी विभागाचे बोगस बियाणे रोखण्यासाठी भरारी पथके; 1891 जॅकेट जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी – अमरावती | बोगस बियाणे मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना गेल्या वर्षी मोठा आर्थिक फटका बसला होता. या वर्षी पुन्हा एकदा बोगस बियाणे आणि बियाण्यांचा काळाबाजार होत असल्याची माहिती आणि तक्रारी कृषी विभागाकडे आल्या होत्या. त्यानुसार, कृषी विभागाने कारवाई केल्यानंतर या गोष्टी समोर आल्या आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत सहा कारवाया करण्यात आल्या आहेत.

15 जूनच्या अगोदरच विदर्भामध्ये यंदा मान्सून दाखल झाला आहे. या वर्षी लवकर पाऊस आल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे, आणि जमीन पेरणी लायक झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. मात्र कृषी विभागाने अमरावती जिल्ह्यातील अंजन्सिंगी येथे बीटी बियाणे अप्रमाणित असलेले 1891 जॅकेट जप्त केले, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे. व शेतकरी मोठ्या प्रमाणात गोंधळा आहे.

गेल्यावर्षी अप्रमाणित बियाणे उगवले नसल्यामुळे आणि दुबार पेरणी करावी लागल्यामुळे, एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास दोन हजार शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊन, विदर्भातील शेतकरी खचला होता. त्यामुळे, यावर्षी या गोष्टीला आळा घालण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर कृषी विभागाने भरारी पथके तयार केली आहेत. सोबतच, शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना बियाणांची पक्की बिलांच्या सोबतच, बियाण्यांची किंमत अशा बाबी तपासून घेऊनच बियाणे खरेदी करावे. असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा

Leave a Comment

error: Content is protected !!