Bogus Seeds: शेतकऱ्यांनो, फसवणूक टाळायची असल्यास ‘असे’ ओळखा बोगस बियाणे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या (Bogus Seeds) सगळीकडे खरीप पूर्व तयारी (Kharif Preparation) जोरात सुरू आहे. शेतकर्‍यांची बियाणे व इतर शेतीविषयक निविष्ठा खरेदी करण्यासाठी लगबग सुरू असेल.बियाण्यांच्या बाबत सांगायचं झाल्यास प्रत्येक खरीप हंगामात  शेतकर्‍यांना डोकेदुखी ठरणारा विषय म्हणजे ‘बोगस बियाणे’(Bogus Seeds).

यंदा जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे अनधिकृत, बोगस बियाणे (Bogus Seeds) विक्रीला येऊ नयेत म्हणून कृषी विभागाची (Agriculture Department) सात भरारी पथकेही सतर्क झाली. शेतकर्‍यांनी अनधिकृत, बोगस बियाणे कसे ओळखावे? याबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शनही केले जाणार आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही खरीप हंगामात (Kharif Season) चार लाखापेक्षा अधिक हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले. यंदाही खरीप हंगामात सोयाबीनची (Soybean Sowing) सर्वाधिक पेरणी अर्थात 3 लाख 7 हजार हेक्टरवर होणार आहे.

खरीप हंगाम जवळ येत असल्याने बी- बियाणे, कीटकनाशके विक्री करण्यासाठी विविध कंपन्यादेखील (Krushi Seva Kendra) सरसावल्याचे दिसून येते. सोयाबीन (Soybean Seeds), कपाशी (Cotton Seeds) सोबतच अन्य पिकांचे अनधिकृत, बोगस बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारण्यासाठी काही कंपन्यांचे एजंट सक्रिय झाल्याने शेतकर्‍यांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनधिकृत बोगस बियाण्यांचा शिरकाव जिल्ह्यात होऊ नये म्हणून कृषी विभागाची सात भरारी पथके अलर्ट झाली.

जिल्ह्यात सोयाबीनचे पुरेसे बियाणे उपलब्ध असल्याने फसवणुकीची शक्यता कमीच आहे. परंतु कपाशीच्या बियाण्यांची टंचाई (Seed Shortage) लक्षात घेता अन्य जिल्हा किंवा राज्यातून अनधिकृत, बोगस बियाणे (Bogus Seeds) जिल्ह्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकर्‍यांनी अधिकृत प्रमाणित बियाणेच खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले.

असे ओळखा बोगस बियाणे ( Identification Of Bogus Seeds)

  • शासनाचा उत्पादन अथवा विक्री परवाना नसणे
  • बीज प्रमाणिकरण यंत्रणेकडून प्रमाणित नसलेले बियाणे, तपासणी केल्याचा रिपोर्ट नसल्यास बियाणे अनधिकृत किंवा बोगस असल्याचे समजावे
  • बोगस बियाण्याच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, वाण तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केली याचा उल्लेख नसतो.
  • पाकिटावर मालाच्या गुणवत्तेचे विवरण नसते.

काळजी काय घ्यावी?

अधिकृत परवाना धारक कृषी विक्रेत्यांकडून बियाणे, खते खरेदी करावी.  खरेदी वेळी न चुकता पक्के बिल घ्यावे. देयकात पीक, वाण प्लॉट क्रमांक, वजन, अंतिम मुदत, कंपनीचे नाव संपूर्ण नमूद असावे. कृषी केंद्र धारकाने पक्के बिल संपूर्ण विवरणासह न दिल्यास नजीकच्या कृषी विभागाकडे संपर्क साधावा.

error: Content is protected !!