हॅलो कृषी ऑनलाईन: मध्यप्रदेशमधील गहू उत्पादक (Bonus On Wheat In MP) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण 2024-25 हंगामासाठी 125 रुपये प्रति क्विंटल बोनस जाहीर करणारे मध्य प्रदेश सोमवारी दुसरे मोठे गहू उत्पादक राज्य बनले आहे. मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये अनेक महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यावेळी गव्हाच्या अधिकृत खरेदीवर 125 रुपये बोनस (Bonus On Wheat In MP) देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे. त्यामुळे बोनससह, मध्य प्रदेशातील गव्हाची अधिकृत खरेदी किंमत 2,400 रुपये प्रति क्विंटल एवढी असेल.
केंद्राने निश्चित केलेल्या गव्हाची किमान आधारभूत किमती (एमएसपी) 2,275 रुपये प्रति क्विंटलवर बोनस दिला जाणार आहे. राज्यात लवकरच हंगामासाठी खरेदी सुरू होणार आहे. एवढेच नाही तर या बैठकीत शेतकऱ्यांची खत आणि खताची गरज लक्षात घेऊन मध्य प्रदेश राज्य सहकारी पणन महासंघाला पुन्हा नोडल एजन्सी म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये 850 कोटी रुपयांचे मोफत शासकीय अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
मध्यप्रदेश हे देशातील सर्वात जास्त गहू उत्पादक राज्यांपैकी एक आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये, राजस्थानने गहू खरेदीवर प्रति क्विंटल 2,275 रुपयांच्या एमएसपीपेक्षा अधिक 125 रुपये बोनस जाहीर केला आहे. राजस्थान मधील खरेदी सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) च्या वास्तविक गरजेपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. वृत्तपत्राच्या अंदाजानुसार भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने ही घोषणा होती. तसेच केंद्राच्या प्रमुख योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचे टॉप-अप देण्याची घोषणा केली आहे जी आता प्रतिवर्षी 6,000 रुपयांपेक्षा जास्त आहे (Bonus On Wheat In MP).