Brinjal Farming : वांग्याला दर मिळेना, शेतकऱ्याने लढवली शक्कल; 10 गुंठ्यात 80 हजार नफा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात भाजीपाला पीक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात वांग्याची लागवड (Brinjal Farming) करतात. वांग्याला बाजारात नेहमीच मोठी मागणी असते. मात्र, कधी कधी मागणी पेक्षा बाजारात आवक जास्त राहिल्यास शेतकऱ्यांना वांग्याच्या पिकातून मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते. ज्यामुळे अनेकदा ‘शेतकऱ्याला पिकवता येते, मात्र विकता येत नाही’ हे आपण नेहमीच बोलले जात असल्याचे आपण ऐकले आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून वांग्याचे दर घसरलेले आहेत. या दर घसरणीला कंटाळलेल्या एका वांगी उत्पादक शेतकऱ्यांने (Brinjal Farming) नामी शक्कल लढवत, केवळ १० गुंठ्यातुन ८० हजारांचे उत्पन्न घेतले आहे.

वांग्याच्या दराने फसवले (Brinjal Farming Seeds)

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील राहाटी येथील सुशिक्षित शेतकरी शंकर कौसले यांनी डिसेंबर महिन्यात वांग्याची लागवड (Brinjal Farming) केली. १० गुंठे जमिनीत त्यांनी १ हजार रोपे लावली होती. गेल्या डिसेंबर महिन्यात वांग्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे शंकर यांना देखील अधिक भाव मिळून चांगला फायदा होईल. अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांची ही अपेक्षा फोल ठरली. कारण जानेवारी महिन्यात घसरलेले वांग्याचे दर, अजूनही ३ ते ६ हजारांच्या दरम्यान रेंगाळलेले आहे.

लढवली बियाणे निर्मितीची शक्कल

परिणामी, शेतकरी शंकर कौसले बियाणे यांनी बियाणे निर्मितीकडे वळण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांची वांगी तोडणीला आली असून, एका वांग्याचे वजन तीन ते साडेतीन किलो असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय त्यांना एका वांग्यातून २७ ग्रॅम बियाणे मिळत आहे. ज्यामुळे आपल्याला संपूर्ण १० गुंठ्यांवरील वांग्याच्या पिकातून एक क्विंटलहुन अधिक बियाणे मिळण्याची अपेक्षा आहे.

80 हजारांचा नफा

दरम्यान, शेतकरी शंकर कौसले यांना १० गुंठे जमिनीतील वांगी लागवडीसाठी एकूण १५ हजार रुपये इतका खर्च आला. तर वांग्याच्या एका क्विंटल बियाणेसाठी जवळपास ९५ हजार रुपये क्विंटलचा दर मिळतो. त्यामुळे खर्च वजा जाता, बियाणे निर्मितीकडे वळल्याने आपल्याला १० गुंठ्यात ८० हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळणार आहे. असे त्यांनी म्हटले आहे. अर्थात त्यांनी लढवली ही शक्कल अन्य शेतकऱ्यांसाठी सध्या प्रेरणादायी ठरत आहे. दर मिळाला नाही म्हणून न डगमगता त्यांनी अन्य मार्गाने उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला हे प्रशंसनीय आहे.

error: Content is protected !!