Brinjal Farming : हमखास भाव देणाऱ्या वांग्याची करा लागवड; मिळेल भरघोस उत्पन्न!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतकरी मोठया प्रमाणात वांग्यासह (Brinjal Farming) अनेक भाजीपाला पिकांची लागवड करतात. त्या-त्या भागात शेतकरी हंगामानुसार भाजीपाला पिकांचे उत्पादन घेत असतात. भाजीपाला पिके ही कमी कालावधीत शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवून देणारे पीक मानले जाते. त्यामुळे आता तुम्हीही भाजीपाला पिकाचे उत्पादन घेण्याचा विचार करत असाल तर वांग्याचे पीक हे तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. बाजारात वांग्याला बाराही महिने मागणी असते. याशिवाय त्याला दरही चांगला मिळतो. त्यातच सध्या लग्नसमारंभांचा हंगाम सुरु झाल्याने पुढील सहा महिन्याच्या काळात वांग्याला (Brinjal Farming) बाजारात मागणीही चांगली राहू शकते.

कालावधी कोणता? (Brinjal Farming Give Guaranteed Prices)

वांग्याची लागवड (Brinjal Farming) ही प्रामुख्याने शरद ऋतूमध्ये जुलै ते ऑगस्ट या कालावधीत आणि ग्रीष्म ऋतूमध्ये जानेवारी ते फेब्रुवारी महिन्याच्या कालावधीत केली जाते. याशिवाय ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर या कालावधीतही वांग्याची लागवड केली जाते. सध्याच्या लागवडीसाठी जानेवारी महिन्यात रोपे तयार करून किंवा नर्सरींमधून रोपे आणत वांगी लागवड केली जाऊ शकते. कमी वाढणाऱ्या जातीसाठी हेक्‍टरी 400 ते 500 ग्रॅम बियाणे पुष्कळ ठरते. तर संकरित जातीचे 200 ते 250 ग्रॅम बियाणे वापरले जाऊ शकते. सध्या शेतकऱ्यांना नर्सरीचाही पर्याय उपलब्ध असल्याने थेट रोपे ऑर्डर केली जाऊ शकतात.

माती कशी असावी?

पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीसह सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये वांग्याची लागवड केली जाऊ शकते. सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण योग्य असलेली वालुकामय चिकणमाती तसेच काळपोटी माती देखील वांग्याची लागवड करण्यासाठी चांगली मानली जाते. ज्या मृदेमध्ये वांग्याची लागवड करणार आहात. त्या मृदेचा पीएच (सामू) हा 6 ते 7 इतका असणे आवश्यक असते. याशिवाय वांग्याला पाणी देण्याची योग्य सोय असणे देखील गरजेचे असते.

कोणते वाण निवडावे?

महाराष्ट्रात प्रामुख्याने मांजरी गोटा, कृष्णा, फुले हरित, फुले अर्जुन यांसारख्या सुधारित व संकरित जातींच्या माध्यमातून वांग्याची लागवड (Brinjal Farming) केली जाते. तर उत्तर भारतीय राज्यांमध्ये पूसा पर्पल लोंग, पूसा पर्पल कलस्टर, पूर्सा हायब्रिड 5, पूसा पर्पल राउंड, पंत रितूराज, पूसा हायब्रिड-6, पूसा अनमोल या जातींची निवड केली जाते. याशिवाय वांग्याच्या आणखीही विविध जाती आहेत. मात्र स्थानिक बाजारपेठेच्या मागणीनुसार वांग्याची जात निवडणे योग्य ठरते. जेणेकरून किडींचा प्रादुर्भाव होत नाही आणि दरही चांगला मिळतो. वांग्याचे अधिक उत्पादन मिळवण्याठी लागवड एका विशिष्ट अंतरावर होण्याची आवश्यकता असते. त्यामुळे वांग्याच्या दोन झाडांमध्ये आणि दोन ओळींमध्ये 60 ते 90 सेंटीमीटर इतके अंतर परिणामकारक मानले गेले आहे.

किती दिवसांत तोडणी?

साधारणपणे 45 ते 50 दिवसांमध्ये वांग्याचे पीक तोडणीला येते आणि तीन ते साडेतीन महिने उत्पादन सुरु राहते. मुख्यतः चार ते पाच दिवसांनंतर वांग्याची नियमित काढणी करावी. कोवळी आणि योग्य त्या अवस्थेत तोडलेली वांगी ग्राहकांच्या पसंतीस पडतात. दरम्यान, वांग्याचे हेक्‍टरी साधारणपणे 200 ते 300 क्विंटल उत्पादन मिळू शकते. काही संकरित जातींपासून 400 ते 500 क्विंटलपर्यंत देखील वांग्याचे उत्पादन मिळू शकते. साधारणपणे बाजारात वांग्याला 10 रुपये प्रति किलोच्या खाली दर मिळत नाही. त्यामुळे वांग्याच्या एका वेळी लागवड केलेल्या पिकातून जवळपास 2 लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळवले जाऊ शकते. संपूर्ण वांग्याच्या पिकाच्या कालावधीत रोपे तयार करण्यापासून काढणीपर्यंत, किडींचे योग्य नियोजन केल्यास खात्रीशीर उत्पन्न मिळते.

error: Content is protected !!