Brinjal Farming : वांग्यावर कीड प्रादुर्भाव होण्यापुवीच करा ‘हे’ उपाय; अन्यथा बसेल आर्थिक फटका!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची (Brinjal Farming) उपलब्धता अशा शेतकऱ्यांनी उन्हाळी वांगी लागवड केली आहे. मात्र, शेतकऱ्यांना वांग्याचे पीक घेताना, कीड प्रादुर्भावाचा सर्वाधिक सामना करावा लागतो. वांगी लागवड केल्यानंतर प्रामुख्याने शेतकऱ्यांना फळ आणि देठांना छिद्रे पडणाऱ्या अळीचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. ज्यामुळे उत्पादनात घट होऊन, मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. अशावेळी शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतात. मात्र, अशा वेळी शेतकऱ्यांनी फवारणी (Brinjal Farming) ऐवजी काही उपाय करणे आवश्यक असते.

कशी होते किडींची पैदास? (Brinjal Farming Pest Infestation)

सामान्यपणे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात लागवड केल्यानंतर मार्च महिन्यात वांग्यावरील (Brinjal Farming) वयस्क मादी किडी ही दुधाळ रंगाची अंडी झाडाच्या पानाच्या खालच्या बाजूने घालते. ज्यामुळे देठ आणि फळे अधिक जवळ असतात. अशावेळी किडींची पैदास वाढीनंतर वांग्याच्या फळावर आणि आणि देठांवर आक्रमण करते. ज्यामुळे ऐन वाढीच्या व फुगवणीच्या अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव फळास होऊन, ती फळाला छिद्र पाडते. त्यानंतर प्रामुख्याने त्या छिद्रावाटे जिवाणू आणि बुरशीचा आता फळामध्ये प्रवेश होऊन, ते फळ सडण्यास सुरुवात होते. अशावेळी वांग्यावरील पूर्ण विकसित झालेली ही किडी प्रामुख्याने गुलाबी, भुऱ्या रंगाची असल्याचे पाहायला मिळते.

कसे करावे नियंत्रण?

प्रामुख्याने शेतकऱ्यांनी वांगी लागवडीनंतर (Brinjal Farming) दोन आठवड्यांच्या आत फळधारणा होण्याच्या अगोदरपासून कामगंध सापळे लावण्याची व्यवस्था करावी. ज्यामुळे तुम्हाला कीटकनाशकांवरील खर्च कमी होउन, पिकांवरील प्रभावी कीड नियंत्रण करता येणार आहे. प्रामुख्याने प्रति एकर पिकासाठी कमीत कमी 4 ते 5 कामगंध सापळे लावावेत. गरज पडल्यास प्रति १० मीटर जागेत लावावे. शेतकऱ्यांनी किडींचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी त्याच त्याच जमिनीत पुन्हा पुन्हा वांग्याचे पीक घेण्याची चूक करू नये. शेतातील तण नियंत्रणावर विशेष भर द्यावा.

धने, सौफ यांची लागवड

विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी वांग्याचे पीक घेताना दोन वांग्याच्या बेडमधील जागेत धने किंवा सौफ यांची लागवड करावी. यामुळे कीड नियंत्रणास मोठी मदत होते. किड लागलेले शेंडे दिसून आल्यास अळीसकट नष्‍ट करावेत. 40 ग्रॅम कार्बारिल किंवा 14 मिली मोनोक्रोटोफॉस 36 टक्‍के किंवा 2.4 मिली सायफरमेथिन, 25 टक्‍के 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. किंवा 10 टक्‍के कार्बारिल भूकटी दर हेक्‍टरी 20 किलो या प्रमाणात झाडांवर धुरळावी.

error: Content is protected !!