Brinjal Farming : ‘या’ प्रजातीच्या वांगी लागवडीतून मिळेल भरघोस उत्पन्न; वाचा… वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांचा वांग्याच्या लागवडीकडे (Brinjal Farming) ओढा वाढला आहे. गुणवत्तापूर्ण वांग्याला हॉटेल, मॉल, तसेच दैनंदिन आठवडे बाजारात मोठी मागणी देखील असते. विशेष म्हणजे वांग्याचे पीक हे बारमाही घेतले जाणारे पीक आहे. अशातच आता अवघ्या काही दिवसांमध्ये खरीप हंगाम सुरु होणार असून, वांग्याच्या रोपांसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज वांग्याच्या तीन प्रमुख प्रजातीच्या (Brinjal Farming) बियाण्याबाबत जाणून घेणार आहोत…

घरपोच बियाणे मिळणार (Brinjal Farming Variety)

शेतकऱ्यांना वांग्याच्या लागवडीसाठी (Brinjal Farming) अधिकृतपणे बियाणे खरेदी करायचे असल्यास शेतकरी राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या (एनएससी) संकेतस्थळावरून थेट बियाणे मागवू शकतात. एनएससीच्या संकेतस्थळावर शेतकरी सर्व प्रकारच्या फळे आणि भाजीपाल्याचे बियाणे थेट घरपोच मागवू शकतात. याच पार्श्वभूमीवर आपण वांग्याच्या 9922 प्रजाती, पूसा हिरवी प्रजाती आणि कुकू प्रजाती या तीन प्रजातीच्या वांग्याची वैशिष्ट्ये पाहणार आहोत.

‘या’ आहेत तीन प्रजाती

1. 9922 प्रजाती : 9922 ही वांग्याची हायब्रीड प्रजाती (Brinjal Farming) असून, तिचा रंग काळसर आकार गोल किंवा आयताकार असतो. या वांग्याची लांबी जवळपास 8 ते 10 सेमी इतकी असते. वांग्याचे हे वाण खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात लागवड केले जाऊ शकते. या वाणाची लागवड ही देशातील सर्वच राज्यांमध्ये केली जाऊ शकते. एनएससीने 9922 प्रजातीच्या वांग्याचे 10 ग्रॅम बियाण्याचे पॅकेट हे 42 रुपये इतक्या नाममात्र किमतीत उपलब्ध करून दिले आहे.

2. पुसा हिरवी वांगी : पुसाच्या हिरव्या प्रजातीचे वांगे हे आकारात गोल असते. या वांग्याची लागवड मैदानी भागात केली जाते. या वाणाचे वांग्याचे पीक किमान 55 ते 60 दिवसांमध्ये तोडणीला येते. पुसाच्या हिरव्या प्रजातीचे वांग्याचे 25 ग्रॅम बियाण्याचे पॅकेट, शेतकऱ्यांना एनएससीने केवळ 20 रुपये इतक्या नाममात्र दरात उपलब्ध करून दिले आहे.

3. कुकू प्रजाती : वांग्याची कुकू प्रजाती ही खरीप हंगामासाठी वापरली जाणारी विशेष प्रजाती आहे. या प्रजातीचे वांगे 100 ते 110 दिवसांत तोडणीला येते. या वाणाच्या लागवडीपासून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 300 क्विंटल उत्पादन मिळते. कुकू प्रजातीचे 10 ग्रॅम बियाणे हे एनएससीच्या संकेतस्थळावर, शेतकऱ्यांसाठी केवळ 46 रुपयांना उपलब्ध आहे.

error: Content is protected !!