Bt Cotton Seed Rate: आगामी खरीप हंगामासाठी बीटी कापूस बियाण्याची किंमत 864 रुपये प्रति पॅकेट निश्चित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: केंद्रीय कृषी मंत्रालयाने (Bt Cotton Seed Rate) आगामी खरीप हंगामासाठी बीटी कापूस बियाण्याची कमाल किरकोळ किंमत (MRP) बोलगार्ड 1 साठी ₹ 864/पॅकेट आणि बोलगार्ड 2 साठी ₹ 635 निश्चित केली आहे (Bt Cotton Seed Rate) . 2019 नंतरची सर्वात कमी दरवाढ असल्याचे सांगण्यात आले आहे. जून महिन्यात मॉन्सूनच्या आगमनाने पेरणीला सुरुवात होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.  

संयुक्त सचिव अजित कुमार साहू यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत मंत्रालयाने म्हटले आहे की, अत्यावश्यक वस्तू कायदा, 1955 (55 पैकी 10) च्या कलम 3 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून तसेच केंद्र सरकारद्वारा निर्मित समितीने केलेल्या शिफारसी विचारात घेऊन, बॅसिलस थुरिन्जिएनसिस (Bt.) कापूस बियाणे पॅकेट्सची ही किंमत (Bt Cotton Seed Rate) 2024-25 आर्थिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेली आहे.

2023-24 मध्ये, सरकारने बोलगार्ड 2 ची किंमत 5 टक्क्यांनी वाढवून ₹853 केली होती आणि बियाणे उद्योग पुढील हंगामात अशीच वाढ होण्याची आशा करत होता. काही उद्योग तज्ज्ञांनी कमी दर वाढीचे श्रेय कापूस पिकविणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक भागात गेल्या वर्षीच्या दुष्काळाला दिले. भारतातील शेतकरी कापूस पिकवण्यासाठी बोलगार्ड 2 वापरतात.

उद्योगाच्या अंदाजानुसार 2023 मध्ये कापूस बियाणे उत्पादनात 30-40 टक्के घट झाली होती आणि तोटा भरून काढण्यासाठी मागील वर्षाच्या तुलनेत फारसा अधिशेष नव्हता.

खरीप 2023 मध्ये, सुमारे 4.8 कोटी पॅकेट्सच्या उपलब्धतेच्या तुलनेत वास्तविक विक्री 4.4 कोटी पॅकेट्स (प्रत्येकी 450 ग्रॅमची) होती, असे फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्री ऑफ इंडिया (FSII) चे सल्लागार यांनी यापूर्वी सांगीतले होते. खरीप 2022 मधील 4.2 कोटी पॅकेट्सवरून 2023 मध्ये खरीप 4.8 कोटी पॅकेट्सची मागणी वाढण्याची उद्योगाची अपेक्षा होती.

लांबलेला पाऊस आणि कोरड यामुळे ही घसरण झाली. अनेक ठिकाणी उगवण सुद्धा चांगली झाली नाही. बियाणे निर्मितीसाठी कपाशीचे पीक प्रत्येक बाबतीत चांगले असणे आवश्यक आहे, असे फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्री ऑफ इंडिया (FSII) चे सल्लागार कौंडिण्या यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!