Buffalo Breeds : भदावरी म्हशीच्या दुधात असते 14 ते 18 टक्के फॅट; वाचा किती देते दूध?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशामध्ये ग्रामीण भागात दूध व्यवसायामुळे (Buffalo Breeds) शेतकऱ्यांची चांगली भरभराट झाली आहे. शेतकरी प्रामुख्याने त्या-त्या भागात, संबंधित वातावरणानुसार म्हशींच्या जातींचे पालन करताना दिसतात. देशात म्हशींच्या अनेक जाती आहेत. त्यातीलच एक जात म्हणजे भदावरी म्हैस होय. या म्हशीची विशेषतः म्हणजे तिच्या दुधामध्ये मोठ्या प्रमाणात फॅट असते. ज्यामुळे अधिकचा दर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून या जातीच्या म्हशीला विशेष मागणी असते. या जातीच्या म्हशीच्या (Buffalo Breeds) दुधामध्ये जवळपास 14 ते 18 टक्क्यांपर्यंत फॅट असते. ज्यामुळे ती इतर जातींपेक्षा वेगळी ठरते.

भदावरी म्हशीचे मूळस्थान (Buffalo Breeds Bhadavari 14 To 18 Percent Fat)

भदावरी जातीची म्हैस ही प्रामुख्याने आग्रा, इटावा, मुरैना, ग्वालियर या उत्तर-मध्य भारतातील जिल्ह्यांमध्ये आढळते. या सर्व जिल्ह्यांच्या भागाला पूर्वी ‘भदावर’ नावाने ओळखले जात होते. ज्यामुळे या म्हशीचे नाव ‘भदावरी म्हैस’ (Buffalo Breeds) असे पडले. या प्रजातीची म्हैस ही प्रामुख्याने लालसर तपकिरी रंगाची असते. तर तिचा बांधा हा मध्यम आकाराचा असतो. पुढील बाजूने ही म्हैस बारीक तर मागील बाजूने काहीशी फुगीर असते. या म्हशीची शिंगे ही सपाट, जाड व मागे तसेच आतील बाजूस वळलेली असतात. या प्रजातीच्या रेड्याचे वजन हे 400 ते 500 किलो तर म्हशीचे वजन हे 350 ते 400 किलो इतके असते.

किती दूध देते?

भदावरी जातीची म्हैस ही दररोज 6 ते 8 लिटर दूध देण्यास सक्षम आहे. भदावरी म्हैस ही मुऱ्हा म्हशीपेक्षा कमी दूध देते. मात्र, ती तूप निर्मितीसाठी सरस ठरते. विशेष म्हणजे जगातील कोणत्याही म्हशीच्या दुधात इतक्या मोठ्या प्रमाणात फॅट नसते. या म्हशीच्या दुधामध्ये सर्वाधिक 14 ते 18 टक्के फॅट आढळते. तसेच ही म्हैस आपल्या एकूण प्रजननकाळात सरासरी 1300-1500 लिटर दूध देण्यास सक्षम मानली जाते.

किती आहे किंमत?

भदावरी म्हशीच्या (Buffalo Breeds) दुधामध्ये मोठ्या प्रमाणात फॅट असल्याने, आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात ही म्हैस खरेदी करण्याचा विचार मनात आला असेल. तसेच या म्हशीची किंमत किती असेल. हा विचार देखील शेतकऱ्यांचा मनात आला असेल. तर ही म्हैस प्रामुख्याने शेतकऱ्यांना 60 ते 70 हजारांपर्यंत मिळू शकते. शेतकऱ्यांनी शक्यतो कोणत्याही ऑनलाईन प्रलोभनांना बळी न पडता, सुरक्षित मार्गाने जनावरांची खरेदी करावी.

काय आहेत ‘या’ म्हशीची वैशिष्ट्ये

भदावरी प्रजातीच्या म्हशीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही म्हैस कोणत्याही प्रकारच्या वातावरणात जुळवून घेते. ज्यामुळे देशातील प्रत्येक राज्यामध्ये ही म्हैस पाळणे सहजशक्य आहे. दूध उत्पादकांना म्हशीच्या दुधाला अधिक फॅट मिळवून, दुग्ध व्यवसायात आर्थिक भरभराट करून घ्यायची असेल. तर त्यांच्यासाठी ही म्हैस उत्तम पर्याय ठरणार आहे. या प्रजातीच्या म्हशीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिला तुलनेने कमी चारा लागतो. असे असूनही ती गुणवत्तापूर्ण दूध देण्यास महत्वपूर्ण ठरते. त्यामुळे या म्हशीच्या चाऱ्यावर शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो. याशिवाय या प्रजातीच्या म्हशीची रोगप्रतिकारशक्ती उत्तम असते. तसेच ती अत्यंत कठीण परिस्थितीतही तग धरून राहते.

error: Content is protected !!