Buffalo Breeds : मुऱ्हा की जाफराबादी दोन्हीपैकी कोणती म्हैस निवडावी; वाचा.. संपूर्ण माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतमालाच्या दरात असलेलया अनिश्चिततेमुळे अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसायाकडे (Buffalo Breeds) वळत आहे. यात अनेक जण शेतीसोबतच एक किंवा दोन म्हशी घेऊन दुग्ध व्यवसाय करताना दिसून येतात. त्यामुळे आता तुम्ही देखील डेअरी व्यवसाय करण्याच्या विचारात असाल. मात्र, मुऱ्हा किंवा जाफराबादी यातील नेमकी कोणती म्हैस निवडावी? याबाबत तुमच्या मनात साशंकता असेल. तर ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा. आज आपण या पोस्टच्या माध्यमातून मुऱ्हा म्हैस आणि जाफराबादी म्हैस यातील नेमक्या कोणत्या म्हशीची डेअरी व्यवसायासाठी (Buffalo Breeds) निवड करावी. याबाबत जाणून घेणार आहोत.

दोन्ही म्हशी वरचढ (Buffalo Breeds Murrah And Jafarabadi)

भारतामध्ये म्हशींच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय करताना प्रामुख्याने मुऱ्हा आणि जाफराबादी म्हैस या दोन प्रजातींच्या म्हशींना (Buffalo Breeds) शेतकऱ्यांची पहिली पसंती असते. यातील मुऱ्हा ही म्हैस मूळची हरियाणा राज्यातील आहे. तर जाफराबादी ही म्हैस मूळची गुजरातच्या सौराष्ट्र भागातील आहे. या दोन्ही म्हशी वरचढ असून, शेतकऱ्यांना पालनातून मोठा आर्थिक फायदा होतो. त्यामुळे डेअरी व्यवसाय सुरु करण्याआधी शेतकऱ्यांना या दोन्ही म्हशींच्या वैशिष्ट्यांबाबत बाबतीत सविस्तरपणे माहिती असणे आवश्यक आहे.

मुऱ्हा म्हशीची विशेषतः?

  • मुऱ्हा म्हैस ही जगातील सर्वाधिक दूध देणाऱ्या म्हशींपैकी (Buffalo Breeds) एक आहे.
  • मुऱ्हा प्रजातीच्या म्हशी संपूर्ण देशभरात आढळतात. मात्र, दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या भागात त्या सर्वाधिक आढळतात.
  • या जातीच्या म्हशींची शिंगे ही जिलेबी सारख्या वळलेली असतात.
  • या जातीच्या म्हशीचा रंग पूर्णपणे काळा असतो.
  • मुऱ्हा म्हशीचे डोके छोटे आणि शेपूट मोठी असते.
  • मुऱ्हा म्हैस दररोज 20 ते 30 लीटर दूध देण्यास सक्षम असते.

जाफराबादी म्हशीची विशेषतः?

  • जाफराबादी म्हशीचा रंग साधारणपणे काळा असतो. मात्र, ती राखाडी रंगात देखील पाहायला मिळते.
  • या म्हशीच्या शरीराचा आकार हा अन्य जातीच्या म्हशींच्या आकारापेक्षा मोठा असतो.
  • जाफराबादी म्हशीची शिंगे लांब आणि वळलेली असतात.
  • याशिवाय या जातीच्या म्हशीचे कान लांब, पायाचे खूर काळे, डोके आणि मानेचा आकार मोठा असतो.
  • जाफराबादी म्हशीच्या कपाळावर पांढरे निशान पाहायला मिळतात. त्यामुळे या निशाणांमुळे या जातीच्या म्हशीची ओळख होते.
  • डोके मोठे असले तरी या जातीच्या म्हशीचे तोंड छोटे असते. तर त्वचा मुलायम असते.
  • जाफराबादी म्हैस देखील दररोज 20 ते 30 लीटर दूध देते. आपल्या एका वेताला ही म्हैस 1800 ते 2000 लीटर इतके दूध देते.
  • या जातीच्या म्हशीचे वजन 750 ते 1000 किलोग्रॅम असते.

कोणती म्हैस निवडावी?

आता तुम्हाला निश्चितच प्रश्न पडला असेल की नेमकी कोणती म्हैस निवडावी. तर दोन्ही म्हशी या दूध देण्याच्या बाबतीत वरचढ आहे. दोन्ही जातीच्या म्हशी दररोज 20 ते 30 लीटर दूध देण्यास सक्षम आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्याही एका जातीच्या म्हशींची निवड करून आपला दूध व्यवसाय करू शकतात. दोन्ही जातीच्या म्हशी व्यवस्थितपणे चारा, पाणी याची काळजी घेतल्यास शेतकऱ्यांना नक्कीच अधिकचे दूध उत्पादन मिळेल.

error: Content is protected !!