Buffalo Breeds : जाफराबादी म्हैस देते दररोज 30 लिटर दूध; प्रसंगी सिंहाशीही भिडण्यास सक्षम!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतीनंतर सर्वाधिक शेतकरी हे दुग्ध व्यवसायाशी (Buffalo Breeds) जोडले गेले आहे. त्यातही काही शेतकऱ्यांच्या दावणीला मोठ्या प्रमाणात म्हशी असल्याच्या पाहायला मिळतात. परंतु, दुग्ध व्यवसाय करताना जातिवंत म्हशींची निवड करणे खूप गरजेचे असते. त्यामुळे अधिक दूध देण्याऱ्या म्हशीच्या प्रजातींमध्ये शेतकऱ्यांसाठी जाफराबादी म्हैस ही उत्तम पर्याय ठरते. ही म्हैस खूप ताकतवर असते. प्रसंगी जंगलाचा राजा सिंहासोबत देखील भिडण्याची क्षमता ठेवते. ही म्हैस गुजरातच्या गीरच्या जंगलाशी संबंधित आहे. आज आपण जाफराबादी म्हशीबाबत (Buffalo Breeds) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

मूळस्थान कोणते आहे? (Buffalo Breeds In India)

जाफराबादी म्हशीचा उगम गुजरातमधील सौराष्ट्र प्रदेशातून झाला आहे. ती गुजरातमधील गीर जंगलात आणि आसपासच्या भागात जसे की जुनागढ, भावनगर, जामनगर, पोरबंदर, अमरेली आणि राजकोट या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आढळते. गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील जाफराबाद भागाच्या नावावरून या म्हशीच्या जातीचे (Buffalo Breeds) नाव देण्यात आले आहे. जाफराबादी म्हशीचे वजन खूपच जास्त असते. म्हशींची ही जात दूध व्यवसाय करणाऱ्यांसाठी सोन्यापेक्षा कमी नाही. म्हशीच्या या जातीला म्हशींचा ‘बाहुबली’ असेही म्हणतात. कारण ही म्हैस दिसायला खूप मजबूत आहे. ज्यामुळे तिची नेहमीच चर्चा होते.

किती दूध देते?

शेतकऱ्यांना कोणतेही दुधाळ जनावर खरेदी करताना पहिला प्रश्न पडतो. तो म्हणजे ही म्हैस किती दूध देते. तर जाफराबादी म्हैस दररोज 30 लिटरपर्यंत दूध देण्यास सक्षम आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना जाफराबादी म्हशीच्या पालनातून मोठा आर्थिक फायदा मिळतो. मात्र, त्यासाठी या म्हशीच्या आहाराची खूप काळजी घ्यावी लागते. तिच्या आहारात धान्य आणि चारा यांचा समतोल असावा लागतो. हिरवा चारा हा धान्याइतकाच महत्त्वाचा आहे. संतुलित आहार असेल तर ही म्हैस मोठ्या प्रमाणात दूध देते.

जाफराबादी म्हशीची वैशिष्ट्ये

  • जाफराबादी म्हशी सहसा काळ्या व राखाडी रंगाच्या असतात.
  • त्याच्या शरीराचा आकार इतर जातीच्या म्हशींपेक्षा खूप मोठा आणि मजबूत असतो.
  • जाफराबादी म्हशीची शिंगे लांब व वक्र असतात.
  • तिचे कान लांब, खुर काळे, डोके व मान जड व शेपटीचा रंग काळा असतो.
  • जाफराबादी म्हशीच्या कपाळावर पांढरे निशाण असतात जे तिची खरी ओळख मानली जाते.
  • तिचे तोंड दिसायला लहान असून त्वचा मऊ व सैल असते.
  • जाफराबादी म्हैस दररोज 30 लिटरपर्यंत दूध देऊ शकते. तर ही म्हैस एका जोपात १८०० ते २००० लिटर दूध देते.
  • तिचे सरासरी शरीराचे वजन 750-1000 किलो पर्यंत असते.जाफराबादी म्हशीची शिंगे लांब व वक्र असतात.

किती असते किंमत?

जाफराबादी म्हैस इतर म्हशींपेक्षा जास्त काळ दूध देते. याशिवाय म्हशीची ही जात दरवर्षी एका वासराला जन्म देते, याचा दुग्ध व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होतो. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या जातीच्या म्हशीची किंमत 90 हजार ते दीड लाख रुपये आहे. जाफराबादी म्हशीची दूध उत्पादन क्षमता जास्त असल्याने ती इतक्या महागात विकली जाते.

error: Content is protected !!