Buffalo Breeds : पंढरपुरी म्हैस देते दररोज 15 लिटर दूध; डेअरीला फॅटही मिळतो अधिक!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात म्हशींच्या माध्यमातून दूध उत्पादन (Buffalo Breeds) करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या देशातील एकूण उत्पादनापैकी 55 टक्के उत्पादन हे आपल्या म्हशीपासून मिळते. हे उत्पादन घेताना शेतकऱ्यांना जातिवंत म्हशींची निवड करणे खूप गरजेचे असते. ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिकाधिक दूध उत्पादन मिळून आर्थिक फायदा मिळण्यास मदत होते. आज आपण महाराष्ट्रातील अशाच एका ‘पंढरपुरी म्हैस’ या जातिवंत म्हशीची माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही देखील ही म्हैस पालन व्यवयाय (Buffalo Breeds) करून मोठ्या प्रमाणात नफा कमवू शकतात.

कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळते? (Pandharpuri Buffalo Breeds)

भारतातील विविध देशी म्हशींच्या जातींपैकी एक म्हणजेच ‘पंढरपुरी म्हैस’ (Buffalo Breeds) होय. ही पंढरपुरी म्हैस ही जात देशाच्या अनेक भागांत आढळते. परंतु तिचे मुळस्थान महाराष्ट्रात आहे. म्हशीची ही जात महाराष्ट्रात पंढरपूर, पश्चिम सोलापूर, पूर्व सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, सांगोला, मंगळवेढा, मिरज, कारवी, शिरोळ आणि रत्नागिरी प्रामुख्याने आढळते. म्हशीच्या या जातीला ‘धारवाडी म्हैस’ असेही म्हणतात. या म्हशीचे नाव महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर गावावरून पडले आहे.

किती दूध देते?

पंढरपुरी म्हैस वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. तिचे ‘धारवाडी आणि पंढरपुरी हे नाव विशेष प्रसिद्ध आहे. अधिक दूध देणारी म्हैस म्हणून या जातीच्या म्हशीची (Buffalo Breeds) ओळख आहे. ती दररोज 15 लिटरपर्यंत दूध देण्यास सक्षम आहे. पंढरपुरी म्हशीच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण म्हणजे तिच्या दुधात तुलनेने अधिक प्रमाणात फॅट असते. ही म्हैस स्थानिक हवामानाशी चटकन जुळवून घेते. त्यामुळे ती देशभरात कुठेही पाळली जाऊ शकते. अति तापमान तसेच चारा व पाण्याच्या कमतरतेदरम्यान देखील ही म्हैस परिस्थितीशी जुळवून घेत टीकाव धरते.

पंढरपुरी म्हैस कशी ओळखायची?

  • पंढरपुरी म्हशीची शिंगे दिसायला तलवारीसारखी असतात. त्यांची लांबी अंदाजे 45 ते 50 सेंटीमीटर असते. शिंगे डोक्यावरून वर आणि आतील बाजूस वळलेली असतात.
  • या म्हशीचे वजन 450 ते 470 किलोपर्यंत असते.
  • पंढरपुरी म्हैस हलकी काळी किंवा तपकिरी रंगाची असते. अनेक पंढरपुरी म्हशींवरही पांढरे डाग असतात.
  • या म्हशीचे केस चमकदार आणि मध्यम आकाराचे असतात.
  • या म्हशीचे डोके लांब व पातळ असते. तर नाकाचे हाड थोडे मोठे असते.
  • पंढरपुरी म्हैस शरीराने कणखर व मजबूत असते.
  • पंढरपुरी म्हैस योग्य ती काळजी घेतल्यास दररोज 15 लिटर दूध देण्यास सक्षम असते.
error: Content is protected !!