Buffalo Breeds : म्हशीची ‘ही’ जात देते 15 लिटर दूध; वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मिळेल की नाही. याची शाश्वती नसल्याने देशातील अनेक शेतकऱ्यांनी दूध (Buffalo Breeds) व्यवसायाची कास धरत आपली प्रगती साधली आहे. शेतीनंतर डेअरी हा दुसऱ्या क्रमांकाचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. आता तुम्हीही शेतकरी असाल आणि दुधाच्या व्यवसायातून चांगली कमाई करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण मोठ्या प्रमाणात दूध देणाऱ्या म्हशीच्या ‘सुरती’ या जातीबद्दल (Buffalo Breeds) जाणून घेणार आहोत.

1800 लिटर देते दूध (Surti Buffalo Breeds 15 Liters Of Milk)

सुरती म्हैस ही म्हशीची अधिक दूध देणाऱ्या जातींपैकी (Buffalo Breeds) एक असून, ती प्रामुख्याने गुजरात या राज्यातील खेडा, बडोदा या ठिकाणी माही आणि साबरमती नद्यांच्या परिसरात आढळते. तुम्हाला या जातीच्या उत्तम म्हशी खरेदी करायच्या असेल तर तुम्ही गुजरातमधील आनंद, कैरा, बडोदा या जिल्ह्यांमध्ये भेट देऊन खरेदी करू शकतात. ही म्हशीची जात साधारणपणे प्रति वेताला 1600-1800 लिटर दूध देते. या म्हशीच्या दुधामध्ये 8 ते 12 टक्के इतके स्निग्धाचे प्रमाण असते. या जातीच्या म्हशी प्रामुख्याने दररोज 15 लिटर दूध देऊ शकतात. या जातीच्या म्हशीच्या दुधाचा रंग हा तपकिरी, चांदीचा राखाडी, किंवा मग काळा असतो. या म्हशींची शरीरयष्टी ही टोकदार धड, लांब डोके आणि मानेकडे वरती वळलेली शिंगे असतात.

‘या’ जातीच्या म्हशींची वैशिष्ट्ये

  • ही म्हैस साधारणपणे गुजरात राज्यात आढळते.
  • ही म्हैस मध्यम आकाराची आणि शांत स्वभावाची असते. अर्थात या जातीच्या म्हशी माणसाळलेलया असल्याने मारकेपणा त्यांच्या स्वभावात नसतो.
  • या जातीची म्हैस ही एका वेतात कमी कमीत 900 ते जास्तीत जास्त 1600 लिटरपर्यंत दूध देते.
  • तिचे डोके बारीक व रुंद आकाराचे असते.
  • शिंगांच्या मध्यवर्ती भागात बहिर्वक्र आकार प्राप्त झालेला असतो.
  • तिचे शिंगे ही टोकदार आणि जास्त मोठी नसतात. अर्थात या म्हशीची शिंगे मध्यम आकाराची असतात.
  • या जातीच्या म्हशीच्या रेड्याचे वजन हे अंदाजित 430 किलो ते 440 किलो इतके असते.
  • तर या जातीच्या म्हशीचे वजन हे अंदाजित 400 किलो ते 410 किलो इतके असते.
  • या जातीच्या म्हशीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या दुधात इतर म्हशींच्या दुधाच्या तुलनेत सर्वाधिक स्निग्धाचे प्रमाण असते.
  • ही म्हैस आपल्या एका वेताच्या काळात जवळपास 290 दिवस दूध देते.

किंमत किती असते?

सर्वसाधारणपणे सुरती या म्हशीच्या जातीला चरोतारी, दख्खनी, गुजराती, नाडियाडी व तालाबारा या नावांनी देखील ओळखले जाते. दूध देण्याची मोठ्या प्रमाणात क्षमता असल्याने ती डेअरी व्यवसायासाठी उत्तम प्रजाती मानली जाते. या म्हशीची बाजारात साधारणपणे 40 ते 50 हजार इतकी किंमत असते. त्यामुळे तुम्हीही सुरती या जातीची म्हैस खरेदी करत आपल्या दूध व्यवसायात आर्थिक भरभराट आणू शकतात.

error: Content is protected !!