Buffalo Meat : यंदा देशातील म्हशीच्या मांस उत्पादनात वाढ होणार; ‘ही’ आहेत तीन कारणे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातील म्हशीच्या मांस उत्पादनासाठी आणि मांस निर्यातीसाठी (Buffalo Meat) 2024 हे वर्ष खूप विशेष असणार आहे. यावर्षी भारतातील म्हशीच्या मांस उत्पादनात आणि निर्यातीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात मांस उत्पादनासाठी कापल्या जाणाऱ्या म्हशींच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. अशातच आता यंदा म्हशीच्या मांस उत्पादन आणि निर्यातीत (Buffalo Meat) मोठी वाढ होणार आहे. असे अमेरिकी कृषी विभागाच्या विदेशी कृषी सेवेद्वारे प्रकाशित एका अहवालात म्हटले आहे.

म्हशीच्या मांसाचा वाटा 17.61 टक्के (Buffalo Meat Export From India)

गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात केंद्रीय पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाच्या अहवालातील आकडेवारीनुसार, देशातील म्हशींच्या संख्येत वाढ झाल्याचे म्हटले होते. याशिवाय या आकडेवारीमध्ये शेळी आणि कोंबड्यांच्या आकडेवारीचा देखील उल्लेख करण्यात आला होता. अशातच आता अमेरिकी कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, भारतातील म्हशींचे मांसाची (Buffalo Meat) मागणी विदेशातच नाही तर देशातंर्गत बाजारात देखील वाढणार आहे. भारतातील एकूण मांस उत्पादनात म्हशीच्या मांस उत्पादनाचा वाटा 17.61 टक्के इतका आहे.

10.64 लाख टनांपर्यंत वाढणार

2022-23 मध्ये उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये सर्वाधिक म्हशीचे मांस (Buffalo Meat) उत्पादन होते. त्यामुळे आता यावर्षी देखील मांस उत्पादनासाठी म्हशींच्या संख्येत वाढ होणार आहे. वर्ष 2023 मध्ये भारतातून जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत एकूण 10.55 लाख टन म्हशीचे मांस निर्यात करण्यात आले होते. ज्यात आता 2024 मध्ये मांस निर्यातीत 10.64 लाख टनांपर्यंत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मांस उत्पादन वाढीमागील कारणे

2023 मध्ये भारताने व्हियेतनाम, सौदी अरेबिया, इराक, संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन, ओमान, फिलीपींस, हांगकांग या देशांना म्हशीचे मांस निर्यात केले आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारी भारताने 10.08 लाख टन मांसाची निर्यात केली आहे. ज्याची किंमत 300.07 कोटी डॉलर इतकी आहे. मांस उत्पादनातील वाढीमागील प्रमुख कारण हे तरुणांमध्ये म्हशींच्या मांस खाण्याबाबत क्रेझ वाढत आहे. मागील काही वर्षांपासून पोषकतत्वांचा मुख्य स्रोत म्हणून बीफ खाण्याकडे वळत आहे. दुसरे म्हणजे अन्य मांसाच्या तुलनेत म्हशीचे मांस हे स्वस्त आहे. तर भारतातील म्हशींचे आजार नियंत्रणात आल्याने, मांस खाणाऱ्यांचा भरोसा वाढला आहे.

error: Content is protected !!