Bullet Tractor : देशी जुगाड… शेतकऱ्यांसाठी आलाय नवीन ‘बुलेट ट्रॅक्टर’; वाचा कितीये किंमत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात (Bullet Tractor) भरमसाठ वाढ झाली आहे. त्या तुलनेने शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळत नाही. याउलट सध्या ट्रॅक्टरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना महागडे ट्रॅक्टर घेणे आवाक्याबाहेरचे असते. ज्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी मोटारसायकल सोबत जुगाड करून, तिला स्वस्तात ट्रॅक्टरचे स्वरूप देत असल्याच्या घटना अलीकडे मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. अशातच आता राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातही अशाच एका जुगाडू ‘बुलेट ट्रॅक्टर’ची (Bullet Tractor) चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.

चंद्रपुरात ‘बुलेट ट्रॅक्टर’ची हवा (Bullet Tractor For Farmers)

विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात नुकतेच ‘ॲडव्हांटेज चंद्रपूर 2024 – इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात हा ‘बुलेट ट्रॅक्टर’ (Bullet Tractor) शेतकऱ्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमात अनेक शेती उपयोगी अवजारे आणि वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. मात्र सर्वांमध्ये हा ‘बुलेट ट्रॅक्टर’ येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता. आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या या ‘बुलेट ट्रॅक्टर’बाबत अनेकजण चौकशी करताना दिसून येत होते.

शेतकऱ्यांसाठी लवकरच उपलब्ध होणार

‘बुलेट ट्रॅक्टर’च्या निर्मिती कर्त्यांकडून लवकरच हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तो शेतातील सर्वच कामे करत असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना नांगरणी, वखरणी, पेरणी, कोळपणी, पिकांना औषध फवारणी तसेच पिकांच्या काढणीसाठी उपयोगी ठरणार आहे. या ट्रॅक्टरला एकूण 4.5 क्विंटल इतके वजन देण्यात आले असून, तो शेतीच्या मशागतीसह पिकांच्या आंतरमशागतीची सर्व कामे अगदी सहजपणे करतो. विशेष म्हणजे या ‘बुलेट ट्रॅक्टर’ला खूपच कमी डिझेल लागत असल्याचा दावा ‘बुलेट ट्रॅक्टर’च्या निर्मात्यांकडून केला जात आहे.

किती आहे किंमत?

सध्या शेतकऱ्यांना महागडे ट्रॅक्टर परवडत नसल्याने, हा ‘बुलेट ट्रॅक्टर’ (Bullet Tractor) अत्यंत माफक किमतीत उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘बुलेट ट्रॅक्टर’ची किंमत ही 1 लाख 70 हजार असणार आहे. तर शेतकऱ्यांना या ट्रॅक्टरच्या अवजारांचा सेट खरेदी करायचा असेल तर त्यांना ट्रॅक्टरसह एकूण अडीच ते तीन लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हा ‘बुलेट ट्रॅक्टर’ स्वस्तात मस्त पर्याय ठरणार आहे.

error: Content is protected !!