Business Idea : शेतकऱ्यांनो ‘या’ फळाची शेती केल्यास व्हाल करोडपती, मिळतोय 1000?Kg असा भाव; जाणून घ्या माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Business Idea । आजही अनेकजण पारंपरिक शेती करत आहेत. परंतु त्यांना प्रत्येक वेळी चांगले उत्पन्न मिळते असे नाही. अनेकदा त्यांना खूप मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते. आजची तरुण पिढी आता आधुनिक शेतीकडे वळली आहे. ते आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करू पाहत आहेत. ड्रॅगन फ्रूट, लिची, मशरूम यांसारख्या पिकांचे उत्पादन घेत आहेत.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

बाजारात सर्वसाधारण फळांपेक्षा या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे जर तुम्हीही या पिकांचे उत्पादन घेतले तर तुम्हीही लखपती होऊ शकता. असेच एक फळ म्हणजे ब्लूबेरी. जर तुम्ही या फळाची शेती केली तर तुम्हाला आता लाखोंची कमाई करता येईल. ब्लूबेरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून त्यात अनेक व्हिटॅमीन्स आणि पोषकतत्व आढळतात. त्यामुळे बाजारात या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

ब्लूबेरीतुन कमावू शकताय लाखो रुपये –

जर तुम्हालाही करोडपती व्हायचे असेल तर तुम्ही ब्लुबेरीची शेती करू शकता. कारण या शेतीतून तुम्हाला चांगला परतावा मिळेल. ब्लूबेरी हे महागड्या फळांपैकी एक असून याच्या एक किलोचा दर तब्बल १००० रुपये किलो इतका आहे. एक एक खूप लोकप्रिय सुपरफूड आहे. देशात या फळाचे कमी प्रमाणात उत्पादन घेतल्याने देशात ब्लूबेरीची आयात करण्यात येते.

जर तुम्ही एकदाच या फळाची लागवड केली तर तुम्हाला एकूण १० वर्षांपर्यंत त्याचे उत्पादन मिळते. एप्रिल आणि मे महिन्यात याच्या रोपांची लागवड करण्यात येते. महत्त्वाचे म्हणजे एका वर्षाच्या आत म्हणजे दहा महिन्यानंतर फळ मिळायला सुरुवात होते. फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये फळ तोडणीनंतर त्याची लगेचच छाटणी केली जाते.

एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे जर तुम्ही प्रत्येक वर्षी छाटणी केली तर चांगले उत्पादन मिळते. एका एकरमध्ये तीन हजार रोपांची लागवड करता येते. एका रोपापासून दोन किलो फळ मिळते. जर एका वर्षात एक हजार रुपये प्रतीकिलोने विचार करायचा झाला तर ६ हजार किलो ब्लूबेरीची विक्री करून तुम्हाला वर्षाला ६० लाख रुपयांची कमाई करता येईल. त्यामुळे आजच या महागड्या फळाची लागवड करून बक्कळ पैसे कमवा.

error: Content is protected !!