Business Idea : शिक्षकाची नोकरी सोडून ‘हा’ व्यवसाय सुरू केला, कमवतायेत लाखो रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Business Idea : शेतीत जास्त श्रम आणि कमी नफा यामुळे लोक नोकरी करण्याला प्राधान्य देत आहेत. खासगी नोकऱ्या करण्यासाठीही लोक रांगेत उभे असतात. पण आज आपण अशाच दोन भावांबद्दल आपण माहिती पाहणार आहोत, ज्यांनी शेतीशी संबंधित व्यवसाय करण्याच्या इच्छेने चांगली खाजगी नोकरी सोडली. आता हे दोन्ही भाऊ फुले, फळे आणि भाजीपाल्याची रोपवाटिका करून महिन्याभरात चांगली कमाई करत आहेत. हे दोघे भाऊ इतर तरुणांसाठीही उदाहरण बनले आहेत.

हे दोन्ही भाऊ राजस्थानमधील करौली जिल्ह्यातील रहिवासी आहेत. एकाचे नाव सुरजन सिंग आणि दुसऱ्याचे नाव मोहर सिंग. दोघेही पूर्वी खासगी शाळेत नोकरी करत होते. यातून त्यांच्या घराचा खर्च भागत नव्हता. अशा परिस्थितीत दोघांनीही वेगळा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. तेव्हाच दोन्ही भावांच्या मनात रोपवाटिका व्यवसाय सुरू करण्याचा विचार आला आणि त्यांनी हा व्यवसाय सुरु केला. (Business Idea) विशेष म्हणजे दोन्ही भावांनी दोन महिन्यांपूर्वी भाड्याच्या जागेवर रोपवाटिका व्यवसाय सुरू केला आहे. दोन्ही भावांचे म्हणणे आहे की हा असा व्यवसाय आहे, ज्यातून कमाई तर होत आहेच पण पर्यावरणही स्वच्छ होत आहे.

तुमचा कोणताही व्यवसाय असेल तर ‘या’ अँप वरून करा मोफत जाहीरात

तुम्ही कोणताही शेतीनिगडीत व्यवसाय करत असाल तर हे मोबाईल अँप तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. तुमची खताचे दुकान असो वा रोपवाटिका तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या. या अँपवर तुम्हाला तुमच्या व्यवसायाची मोफत जाहिरात करता येते तसेच थेट ग्राहक शेतकऱ्याला तुम्ही तुमची वस्तू वा सेवा ऑनलाईन विकू शकता. यामध्ये तुमच्याकडे एखादे वाहन भाड्याने असेल, किंवा तुम्ही मजूर, वायरमन असाल तर हे अँप डाउनलोड करा. यामधली शेतकरी दुकान मध्ये अनेकी सुविधा देण्यात आल्या आहेत.

खाजगी शाळेत शिक्षिक म्हणून करायचे काम (Business Idea)

याबाबत बोलताना सुरजन सिंग सांगतात की, पूर्वी ते एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून काम करायचे. पण त्यातून चांगले उत्पन्न मिळत नव्हते, त्यामुळे रोपवाटिका व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. यानंतर त्यांनी ट्रायल म्हणून छोटी रोपवाटिका उभारून व्यवसाय सुरू केला. याचा खूप फायदा झाला. यानंतर दोन्ही भावांनी मोठ्या जागेत भाड्याने जागा घेऊन रोपवाटिका सुरू केली. आता मोठ्या संख्येने लोक त्याच्या रोपवाटिकेत रोपे घेण्यासाठी येत आहेत. Business Idea

त्याचबरोबर मोहर सिंग म्हणाले की, या रोपवाटिकेत अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. आम्ही कोलकाता येथून अनेक रोपे आणली आहेत, ज्यांची विक्री चांगली होत आहे. याशिवाय रोपवाटिकेत ते स्वतः देशी रोपे तयार करत आहेत. सध्या त्यांच्या रोपवाटिकेत 20 ते 1200 रुपयांपर्यंतची रोपे आहेत.

error: Content is protected !!