Business Idea : शेतीसोबत सुरु करा ‘हे’ 3 जोडधंदे; कमवाल बक्कळ पैसा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील बहुतांश जनता ग्रामीण भागात राहत असून शेतीवरच अनेकांचा उदरनिर्वाह चालतो, शेती हेच उत्पन्नाचे मुख्य साधन मानले जाते. परंतु सध्या महागाईमुळे शेतीसाठी लागणारा अवाढव्य खर्च आणि त्यानंतर त्यातून मिळणारे कमी उत्पन्न यामुळे शेती करणं तस फायद्याचे ठरतच नाही असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही. अशावेळी शेती करत करत त्यासंबधीतच काहीतरी जोडधंदा (Business Idea) करावा आणि त्यामाध्यमातुन आपले उत्पन्न वाढवण्यावर अनेक शेतकऱ्यांचा भर राहिला आहे. तुम्ही सुद्धा अशाच काही जोडधंद्याबाबत विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला शेतीशी संबंधित ३ व्यवसाय सांगणार आहोत जे तुम्ही आरामात करू शकता. आणि या सोबतच गावातील काही शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही रोजगार मिळवून देऊ शकतात. विशेष म्हणजे यातील काही व्यवसायासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना लोन किंवा सबसिडी सुद्धा मिळते. चला आज आपण जाणून घेऊया शेती करत करत तुम्ही कोणते जोडधंदे करू शकता याबाबत….

1) कोंबडीपालन किंवा कुक्कुटपालन (Poultry Farm) –

भारतीय बाजारपेठेत अंडे आणि मांस याला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे कोंबडी पालन किंवा पोल्ट्री फार्म चा व्यवसाय प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू शकतो. आणि तुम्हाला भरगोस फायदा देखील होऊ शकतो. वर्षातील १२ ही महिने कोंबडी आणि अंड्याची मागणी असतेच त्यामुळे पैशाचे येणे चालूच राहते. महत्त्वाचे म्हणजे हा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार कडून अनुदानही मिळते आणि बँकाही तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज देतात. त्यामुळे शेती करत करत कोंबडीपालन व्यवसाय तुमच्यासाठी योग्य ठरेल.

2) पशुपालन आणि डेअरी फार्म (Dairy Farm) – Business Idea

बऱ्याच ठिकाणी आपण डेरी फार्म बघतो. काहींनी पूर्वीपासूनच डेअरी टाकलेली असते परंतु त्यांच्या डेअरीची पकड बऱ्याच गावांमध्ये बसलेली नसते. कारण त्यांच्या डेअरीमध्ये असलेल्या दुधाची क्वालिटी योग्य नसते. पण चांगल्या दुधाच्या कॉलिटी सह तुम्ही तुमचा स्वतःचा डेअरीचा व्यवसाय टाकून नफा कमवू शकतात. लोकसंख्या वाढल्याने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणीही वाढत आहे. त्यामुळे तुमचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतच जाईल. शेती करत असताना दहा-बारा गाई म्हशी पालन करून या डेअरी फार्म ची सुरुवात करू शकतात. याचबरोबर पशूंचे गोबर शेतीसाठी उपयुक्त असते. ते वापरून शेतीमध्ये देखील चांगल्या पिकासाठी फायदा होऊ शकतो.

3) पिठाची गिरणी (Flour Mill) –

गहू दळण्यासाठी किंवा अजून धान्य दळण्यासाठी पिठाच्या गिरणीची गरज फक्त शहरातच नाही तर गावात देखील भासते. पूर्वी आपली आजी किंवा गावाकडील बायका जात्यावर पीठ दळत होत्या. पण आताच्या काळात ते शक्य नसून आज काल पिठाच्या गिरणीची गरज भासू लागलेली आहे. शेतकरी या पिठाच्या गिरणीवर डाळी, गहू दळून त्या बाजारात विकू शकतात. बऱ्याच शहरी भागात दळण दळण्यासाठी वेळ नसल्यामुळे रेडीमेड पीठाची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे शेतकरी हा व्यवसाय करू करून बक्कळ पैसे कमवू शकतात. याचबरोबर सरकारकडून या व्यवसायासाठी उद्यम योजना राबवण्यात येते त्यातून तुम्ही लाभ घेऊ शकता

error: Content is protected !!