Business Ideas : 5 वी पास तरुणाचा झाडू निर्मिती व्यवसाय; महिन्याला कमावतोय 50 हजार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना करता येणारे असे अनेक व्यवसाय (Business Ideas) असतात. मात्र, इच्छाशक्तीच्या अभावामुळे शेतकरी अशा व्यवसायांकडे लक्ष देत नाही. परिणामी, सध्या ग्रामीण भागातील अशिक्षित किंवा शिक्षण न घेतलेल्या शेतकरी कुटुंबातील तरुणांना कमी समजण्याचे काम समाज करत आहे. मात्र, आता एक 5 वी पास शेतकरी कुटुंबातील तरुण आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर खजुराच्या फाद्यांपासून झाडू बनवण्याचा व्यवसाय करत आहे. विशेष म्हणजे हा तरुण झाडू बनवण्यातील आपल्या कौशल्याच्या जोरावर महिन्याकाठी 50 हजारांची कमाई करत आहे. आज आपण तरुणाच्या भन्नाट व्यवसायाबद्दल (Business Ideas) जाणून घेणार आहोत.

वडिलोपार्जित व्यवसायात दिले झोकून (Business Ideas In Rural Sector)

मोहम्मद नफीस असे या झाडू व्यावसायिकाचे (Business Ideas) नाव असून, तो उत्तरप्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील रहिवासी आहे. मोहम्मद याच्या कुटुंबाचा शेतीसोबतच झाडू बनवण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. वडिलांच्या काळापर्यंत त्यांच्या या व्यवसायाला तितकीशी ओळख मिळाली नाही. मात्र, आपल्या काळात मोहम्मद याने झाडू बनवण्याच्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात भरभराट आणली आहे.

कसा करतात झाडू तयार?

मोहम्मद नफीस सांगतो, आपल्या अमवा गावात आपण प्राथमिक शिक्षण (Business Ideas) घेतले. मात्र, घरची हलाखीची परिस्थिती पाहता आपल्याला कमी वयातच शिक्षण सोडावे लागले. मात्र, त्यानंतर आपण पूर्णवेळ आपल्या कुटूंबाला मदत करण्यासाठी दिला. खजुराच्या फांद्यापासून झाडू बनवण्याअगोदर, त्या फांदया पाण्यात भिजवून ठेवाव्या लागतात. त्यानंतर त्या सुखवून कापल्या जातात. त्यानंतर थोड्याफार प्रमाणात विणकाम करून, त्या लाकूड आणि दोऱ्याच्या मदतीने एकत्र बांधून झाडू तयार केला जातो.

किती मिळतंय उत्पन्न?

सध्या आपल्याला या व्यवसायासाठी खजुराच्या फांद्या आणि पाने खरेदी करण्यासाठी 10 से 15 हजार रुपये उत्पादन खर्च येतो. तर त्यातून आपल्याला महिन्याला 50 हजार रुपयांची कमाई हमखास होत असल्याचे तो सांगतो. वडिलांच्या काळात छोटेखानी व्यवसाय चालायचा मात्र, आपण त्यात झोकून देत हा व्यवसाय मोठ्या स्तरावर सुरु केला आहे. झाडू बनवल्यानंतर आपण आपल्या सर्व झाडूंना रायबरेलीपासून ते लखनऊ आणि उत्तरप्रदेशातील महत्वाच्या बाजारपेठांमध्ये ऑर्डरनुसार विक्रीसाठी पाठवतो. वडिलांनी दुकानदारांसोबत चांगले संबंध बनवून ठेवल्याने आपल्याला विक्रीसाठी तितकेसे कष्ट घ्यावे लागले नाही. असे तो सांगतो.

error: Content is protected !!