Business Loan : बिनव्याजी 1 लाख रुपयांचे कर्ज घेऊन सुरू करा स्वतःचा व्यवसाय; होईल लाखोंची कमाई, जाणून घ्या सरकारची योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Business Loan : राज्य आणि केंद्र सरकार (Central Goverment) सर्वसामान्य जनतेच्या फायद्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. ज्याचा अनेकजण लाभ घेताना दिसतात. समजा तुमच्याकडे पैसे नाही आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही आता सरकारी मदत घेऊन कर्ज मिळवू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारच्या या योजनेत तुम्हाला एक लाखाचे कर्ज मिळेल.

त्यासाठी तुम्हाला कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही. वसंतराव नाईक महामंडळ कर्ज असे या योजनेचे नाव आहे. अनेकजण या योजनेचा लाभ घेत आहेत. आता तुम्हीही याचा लाभ घेऊन तुमचा व्यवसाय सुरु करू शकता. ही योजना प्रामुख्याने वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबवली जात आहे. (Business Loan)

तुम्हाला जर सरकारी योजनांची माहिती अगदी सोप्या पद्धतीने जाणून घ्यायची असेल तर आम्ही सांगतो तस करा. पहिल्यांदा तुम्ही प्लेस्टोअरवर जा आणि तेथून Hello Krushi हे अँप इंस्टाल करा. यामध्ये तुम्हाला सरकारी योजनांची माहिती एकदम सोप्या पद्धतीने समजेल. मित्रांनो यामध्ये फक्त सरकारी योजनाच नाही तर रोजचे बाजारभाव, हवामान अंदाज, जमीन खरेदी विक्री, जमीन मोजणी, पशूंची खरेदी विक्री इत्यादी गोष्टींची तुम्हाला माहिती मिळेल.

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक, पॅन कार्ड, जातीचा दाखला, संबंधित व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड आणि मागणी केल्यास इतर कागदपत्रांची गरज पडेल.

योजनेच्या माध्यमातून त्या निगडित प्रकल्पामध्ये मंडळाचा 100% सहभाग असून तुम्हाला यासाठी एकूण एक लाख रुपयांची मदत केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यापूर्वी हे समजून घ्या की जे कर्जदार नियमितपणे याच्या कर्जाची परतफेड करतील त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जात नाही. Business Loan

तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला वसंतराव नाईक महामंडळाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. येथे सर्वात अगोदर तुमच्या नावाची नोंदणी करा, आता नोंदणी झाल्यानंतर लॉगिन करा. आता या योजनेची संबंधित असणारा अर्ज काळजीपूर्वक भरा.

error: Content is protected !!