Business Loan Scheme: वसंतराव नाईक वैयक्तिक/गट कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत मिळावा 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सुशिक्षित बेरोजगार व गरजू व्यक्तींनी व्यवसाय करण्यासाठी (Business Loan Scheme) महाराष्ट्र राज्य सरकारच्या (VJNT) थेट कर्ज योजने अंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रूपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज (Interest Free Loan) मिळण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. जाणून घेऊ या वसंतराव नाईक वैयक्तिक/गट कर्ज व्याज परतावा योजनेबद्दल (Business Loan Scheme) सविस्तर माहिती.

योजने अंतर्गत पुढील व्यवसाय सुरू करू शकता (Business Loan Scheme)

मत्स्य व्यवसाय, कृषी क्लिनिक, पॉवर टिलर, हार्डवेअर शॉप, पेंट शॉप, सायबर कॅफे, संगणक प्रशिक्षण, झेरॉक्स, स्टेशनरी, सलुन, ब्युटी पार्लर, मसाला उद्योग, पापड उद्योग, मसाला मिर्ची कांडप उद्योग, वडापाव विक्री केंद्र, भाजी विक्री केंद्र, ऑटोरिक्षा, चहा विक्री केंद्र, सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र, डी. टी. पी. वर्क, स्विट मार्ट, ड्राय क्लिनिंग सेंटर, हॉटेल, टायपिंग इन्स्टीट्युट, ऑटो रिपेअरींग वर्कशॉप, मोबाईल रिपेअरिंग, गॅरेज, फ्रिज दुरूस्ती, ए. सी. दुरुस्ती, चिकन शॉप, मटन शॉप, इलेक्ट्रिकल शॉप, आईस्क्रिम पार्लर, मासळी विक्री, भाजीपाला विक्री, फळ विक्री, किराणा दुकान, आठवडी बाजारामध्ये छोटसे दुकान, टेलिफोन बुथ, अन्य तांत्रिक लघु उद्योग.

वसंतराव नाईक कर्ज योजने अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड संलग्न बँक खात्याचा तपशील
  • उत्पन्नाचा दाखला (अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रू. १.०० लाखापेक्षा जास्त नसावे)
  • रहिवासी दाखला
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • जातीचा दाखला
  • शपथपत्र

या योजने अंतर्गत दिले जाणारे प्राधान्य (Business Loan Scheme)

  • शासनाच्या कौशल्य विकास विभागा मार्फत तसेच शासकिय/निमशासकीय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेली तसेच अनुभवी तरूण मुले/मुली यांना प्राधान्य देण्यात येईल.
  • निराधार, विधवा महिला इ. लाभार्थींना तात्काळ प्राधान्य.

कर्ज वितरण हप्त्याचे स्वरूप

कर्ज योजनांसाठी योग्य लाभार्थ्यांची निवड व मंजूर प्रकरणात आवश्यक वैधानिक दस्तऐवज पूर्तता केल्यानंतर कर्ज वितरण हप्त्याचे स्वरूप खालील प्रमाणे होते.

  • या कर्ज योजने अंतर्गत मिळणाऱ्या एक लाखांपैकी पहिला हप्ता (७५ %) म्हणजेच 75 हजार रुपये इतका दिला जाईल.
  • दुसरा हप्ता 25 हजार रुपये प्रत्यक्ष (लघु-उद्योग) व्यवसाय सुरू झाल्यानंतर साधारणतः 3 महिन्यांनंतर जिल्हा व्यवस्थापकांच्या तपासणी अभिप्रायानुसार उर्वरित 25% रक्कम उपलब्ध करून दिला जाईल.
  • नियमित कर्ज परतफेड करणा-या लाभार्थीना व्याज आकारण्यात येणार नाही.
  • नियमित 48 समान मासिक हप्त्यामध्ये मुद्दल रू. 2085/- परतफेड करावी लागेल.
  • नियमित कर्जाची परतफेड न करणा-या लाभार्थीना जेवढे कर्जाचे हप्ते थकीत होतील, त्या रक्कमेवर द.सा.द.शे. 4% व्याज आकारण्यात येईल.

योजनेच्या अटी व शर्ती (Business Loan Scheme)

  • अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षे असावे.
  • अर्जदाराने आधार कार्ड संलग्न बँक खात्याचा तपशील सादर करावा.
  • एका वेळी कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल.
  • अर्जदार महामंडळाच्या कोणत्याही (केंद्र व राज्य) योजनेचा थकबाकीदार नसावा.
  • अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रू. 1.00 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • महाराष्ट्राचा रहिवासी असावा, तसेच अर्जदार विमुक्त जाती/भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्गातील असल्यास प्राधान्य.

कर्ज वसूली कार्यपध्दती

  • कर्ज वितरित केल्यानंतर कर्जाची परतफेड ही कर्ज वितरीत केल्याच्या 90 दिवसांनंतर सुरू करण्यात येईल.
  • कर्ज परताव्याचे मासिक हप्ते ठरवून द्यावेत व कर्ज वसुलीच्या दृष्टीने लाभार्थ्याकडून पुढील दिनांकांचे आगाऊ धनादेश घेऊन तसेच ECS (इलेक्टॉनिक क्लिअरन्स सिस्टम) पद्धतीने वसूली करण्यात यावी.

अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा

संपर्क क्रमांक: 2620 2588 | 2620 2588

अधिकृत वेबसाईट: http://www.vjnt.in/Default.aspx

error: Content is protected !!