Busra Chicken Breed: आकर्षक रंगाची, परस बागेत पाळता येणारी ‘बसरा कोंबडीची’ जाणून घ्या माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: परसबागेत पाळल्या (Busra Chicken Breed) जाणाऱ्या कोंबड्यांच्या जातीमध्ये महत्वाची एक जात म्हणजे बसरा कोंबडी. मांस उत्पादनासाठी (Meat Production) पाळल्या जाणाऱ्या या बसरा कोंबडीचे (Busra Chicken Breed) मांस अतिशय रुचकर असते. जर तुम्ही कोंबडी पालन (Poultry Farming) करायचा विचार करत असाल तर जाणून घ्या या जातीबद्दल अधिकची माहिती.

उगम (Busra Chicken Breed)

ही जात महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरातच्या (Gujrat) सीमेवर प्रामुख्याने आढळते. सामान्यतः नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुका आणि महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यांतील साक्री तालुक्यात दिसून येतात तसेच गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील जुनागढ आणि उच्छल तालुक्यातही आढळतात.

शरीर रचना

या कोंबडीची जात (Busra Chicken Breed) शरीराने लहान असून लाल, काळ्या आणि लालसर तपकिरी अशा अनेक रंगांमध्ये आढळते. पिसे पांढर्‍या रंगांची असतात. मान आणि शेपटीवरील पिसांचा रंग काळा असतो. खांदा, पंखांवर लाल-तपकिरी पिसे असतात. नराचे वजन 2.5-3 किलो आणि मादीचे सरासरी वजन 2-2.5 किलो असते.

प्रजनन आणि उत्पादन माहिती

या जातीच्या कोंबड्यांना लैंगिक परिपक्वता 150 ते 210 दिवसांच्या दरम्यान येते. या कोंबड्या प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी पाळल्या जात असल्यामुळे अंडी देण्याचे प्रमाण कमी असते.  वर्षभरात फक्त 40 ते 55 अंडी देतात. या कोंबड्यांचा अंडी उबवणुकीचा दर 60 ते 85 टक्के असतो.

विशेष माहिती

भक्षकांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी या कोंबड्या सरड्याप्रमाणे त्यांच्या शरीराचा रंग बदलतात असे काहीजण म्हणतात पण ते कितपत खरे आहे ते अजून माहित नाही. ही कोंबडी आजाराला लवकर बळी पडते.

या कोंबड्या (Busra Chicken Breed) जरी आकाराने लहान असल्या तरी त्यांना निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहाराची आवश्यकता असते. या कोंबड्या मुक्तपणे राहणे पसंत करतात, त्यामुळे जंगली धान्य आणि कीटक हे त्यांचे प्राथमिक अन्न आहे. जर तुम्हाला तुमच्या आहारात प्रथिने आणि महत्वाची पोषक तत्वे समाविष्ट करायची असल्यास बसरा चिकन हा एक चांगला आणि स्वादिष्ट पर्याय आहे. परंतु या कोंबड्या काही ठराविक भागातच फार कमी प्रमाणात आढळतात.

error: Content is protected !!