सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत झाला महत्वाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soyabean : राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले.

पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, तापमानातील बदल तसेच इतर काही कारणांमुळे सोयाबीनवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेषत: चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर, वाशिम,नांदेड या जिल्ह्यांत हा प्रादुर्भाव दिसत असल्याने सोयाबीनचे पीक पिवळे पडत चालले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

सोयाबीन पिकावर आता मूळकूज, करपा, भुरशी, तांबेरा, यलो मोझॅक, अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आख्खे फडच्या फड पिवळे पडत असून सोयाबीन उत्पादनात मोठी घट निश्चित असल्याने उत्पादक शेतकरी मात्र हतबल झाले आहेत. नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळावा म्हणून प्राधान्याने हे पंचनामे करावेत असे निर्देश देण्यात आले.

शेंगा पोसल्याच नसल्याने चिपट्या बनल्या त्यामुळे ज्वारीसारखे दाणे लागले आहेत. सोयाबीनची काढणी मुदतपूर्व करावी लागणार आहे. परिणामी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!