Captain Tractors : कॅप्टन कंपनीचा ‘हा’ ट्रॅक्टर आहे सर्वाधिक वेगवान; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये मशागतीचे असे एकही काम नाही. ज्यासाठी ट्रॅक्टरची (Captain Tractors) गरज पडत नाही. पेरणी करण्यापासून ते पिकाच्या कापणीपर्यंत इतकेच नाही तर मार्केटला माल घेऊन जाण्यासाठी देखील शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची गरज पडते. त्यामुळे आता तुम्हालाही दुसऱ्याचा भाड्याने ट्रॅक्टर आणणे थांबवून, स्वतःचा ट्रॅक्टर घ्यायचा असेल. तर कॅप्टन कंपनीचा ‘कॅप्टन 280 डीएक्स’ हा छोटा ट्रॅक्टर (Captain Tractors) तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. कारण हा ट्रॅक्टर दिसायला जरी छोटा असला तरी तो मोठी कामे देखील भरभर करतो. कॅप्टन कंपनीने प्रामुख्याने मध्यम आकाराचे शेतीचे क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा छोटा ट्रॅक्टर बनवला आहे.

‘कॅप्टन 280 डीएक्स’ ट्रॅक्टरची विशेषतः (Captain Tractors Captain 280 DX For Farmers)

कॅप्टन कंपनीचा ‘कॅप्टन 280 डीएक्स’ हा मिनी ट्रॅक्टर (Captain Tractors) कंपनीने 1290 सीसी क्षमतेसह 2 सिलेंडरमध्ये तयार केलेला आहे. जो 28 एचपी पॉवर जनरेट करतो. कंपनीने या ट्रॅक्टरला उत्तम प्रतीचा एयर फिल्टर दिलेला आहे. कंपनीचा हा ट्रॅक्टर 2500 आरपीएमची निर्मिती करतो. या ट्रॅक्टरला कंपनीने अधिक क्षमतेची डिझेल टाकी दिलेली आहे. याशिवाय या ट्रॅक्टरला कंपनीकडून अधिक वजन उचलण्याची क्षमता देण्यात आली आहे. ज्यामुळे हा ट्रॅक्टर छोटा असून, देखील मोठी कामे करण्यास पात्र ठरतो. या ट्रॅक्टरचे एकूण वजन 1000 किलोग्रॅम इतके आहे. कॅप्टन कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 2625 एमएम लांबी और 1240 एमएम रुंदी आणि 1550 एमएम व्हीलबेसमध्ये तयार केलेले आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये?

कॅप्टन कंपनीने आपल्या ‘कॅप्टन 280 डीएक्स’ या मिनी ट्रॅक्टरला मेकॅनिकल आणि पॉवर अशा दोन्ही स्वरूपात स्टीयरिंग दिलेले आहे. ज्यामुळे शेतीमध्ये काम करताना शेतकऱ्यांना आरामदायी अनुभव मिळतो. आपल्या या ट्रॅक्टरला कंपनीने पुढील बाजूस 8 आणि मागील बाजूस 2 गिअर दिलेले आहेत. या ट्रॅक्टरमध्ये सिंक्रोमेश टाइप ट्रांसमिशन पाहायला मिळतो. कंपनीने या ट्रॅक्टरला 29 किलोमीटर प्रति तास वेग इतका वेग दिलेला असून, तो इतर सर्व छोट्या ट्रॅक्टरांपेक्षा अधिक असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. याशिवाय कंपनीने या ट्रॅक्टरला ड्राय इंटरनल एक्स शो (वॉटर प्रूफ) ऑइल ब्रेक दिलेला आहे. जो शेतामध्ये काम करताना आणि रस्ते वाहतुकीदरम्यान रस्त्याला जबरदस्त पकड बनवतो. कंपनीचा हा ट्रॅक्टर 2WD ड्राइवसह येतो. तसेच या ट्रॅक्टरला तुलनेने मोठया आकाराचे मजबूत टायर देण्यात आले आहे.

किती आहे किंमत?

कॅप्टन कंपनीने मध्यम शेती क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन, या ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता कंपनीने आपल्या ‘कॅप्टन 280 डीएक्स’ या ट्रॅक्टरची शोरूम किंमत 4.81 लाख ते 5.33 लाख रुपये इतकी निर्धारित केली आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोडटॅक्समुळे या ट्रॅक्टरची किंमत वेगवेगळी पाहायला मिळू शकते.

error: Content is protected !!