Castor Farming : ‘या’ पिकाची शेती करा; 5 ते 7 हजार रुपये प्रति क्विंटलचा मिळतो दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नुकताच होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा (Castor Farming) करण्यात आला. होळीच्या सणाला एरंडाच्या झाडाची फांदी नेहमी पाहायला मिळते. एरंडाच्या फांद्या होळीत टाकण्याची प्रथा आहे. एरंडाचे झाड वर्षायू किंवा बहु वर्षायू पीक आहे. एकदा लागवड केल्यानंतर एक झाड तीन-चार वर्ष त्या ठिकाणी सहज दिसते. या झाडाची बोंडे तोडली नाही तर ते वाळल्याने उन्हाने तडकून बिया जमिनीवर पडतात. त्यातून ही झाडे वाढतात. मात्र, एरंड या औषधी पिकाची शेती कमी खर्चात तुलनेने अधिक उत्पन्न मिळवून देणारी शेती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एरंड पिकाच्या (Castor Farming ) लागवडीकडे वळण्याची गरज आहे.

व्यावसायिकदृष्ट्या महत्वाचे पीक (Castor Farming Cultivate Per Quintal Rate)

देशामध्ये औषधी आणि सुगंधी वनस्पतींची लागवड वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारकडून अरोमा मिशन (Castor Farming) राबविले जात आहे. या औषधी वनस्पतींमध्ये एरंड पिकाचा देखील समावेश असून, एरंड पिकाला आयुर्वेदिकदृष्ट्या खूप महत्व आहे. एरंडी हे खरीप हंगामातील प्रमुख पीक असून, त्याला व्यावसायिकदृष्ट्या औषधी वनस्पती तेलाचे उत्पादन करण्यासाठी वापरले जाते. एरंडाचे तेल हे फॅब्रिक रंग आणि साबण, औषधी तेल आणि बेबी मसाज तेल तयार करण्यासाठी वापरले जाते. एरंड तेलाची बाजारात मोठी मागणी असते. ज्यामुळे शेतकऱ्यांनी एरंडाचे पीक घेतल्यास त्यांना चांगला भाव मिळू शकतो.

खर्चापेक्षा अधिक नफा

कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या हवामानात एरंडाचे पीक घेतले जाऊ शकते. विशेष म्हणजे एरंडाचे पीक घेण्यासाठी इतर पिकांच्या तुलनेत खूप कमी खर्च येतो. याउलट एरंडेल तेलाला देश-विदेशात मागणी असते. ज्यामुळे एरंडाला बाजारात सरासरी 5000 ते 7000 रुपये प्रतिक्विंटलचा दर हमखास मिळतो. एरंडाची लागवड केल्यानंतर एखाद्या शेतकर्‍याने एका हेक्‍टरमध्ये 25 क्विंटल उत्पादन केले तरी फायदेशीर शेती आहे. त्यामुळे त्याला 1 लाख 25 हजार रुपयांपर्यंतचा नफा सहज मिळू शकतो.

एरंडेल तेलाचे आयुर्वेदिक महत्व

एरंडेल तेलाचे बरेच फायदे आहेत. एरंडेल तेल (Castor Farming) शरीरातील वात कमी करते. शरीरातील रक्ताभिसरण वाढायला मदत करते. एरंडेल उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे शरीराचे तापमान वाढायला मदत मिळते. शरीरातील सूज कमी व्हायला मदत मिळते. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या हाडांशी व सांध्यांशी संबंधित दोषांमध्ये एरंडेलाचा फायदा होताना दिसतो. एरंडाच्या तेलासोबतच झाडाच्या पानांचे देखील खूप सारे उपयोग आहेत. एरंडाच्या पानांमुळे जखम बारी होण्यास मदत होते. जखम सुखण्यासाठी आणि घाव कमी करण्यासाठी एरंडाच्या पानांचा उपयोग होतो. एरंडाच्या पानांमुळे कफ,अनिद्रा यापासून सुटका मिळते.

error: Content is protected !!