Cauliflower Cultivation : फ्लॉवर लागवडीतून एकरी 2 लाखांचा नफा; खरेदीसाठी व्यापारी बांधावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cauliflower Cultivation : सध्या महाराष्ट्रातील अनेक शेतकरी गहू, हरभरा, भात, ज्वारी तसेच बाजरी यासारखी परंपरागत पिके घेण्याकडे पाठ फिरवत आहे. त्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञान आणि ठिबक लागवड पद्धतीचा वापर करत फळे व भाजीपाला लागवडीकडे अनेक शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्यातून शेतकऱ्यांना उत्तम नफा मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील गौरझामर परिसरातील शेतकऱ्यांनीही असाच काहीसा मार्ग निवडला आहे. जाणून घेऊया त्यांच्या भाजीपाला शेतीतील यशाबद्दल…

सागर जिल्ह्यातील गौरझामर येथील शेतकरी पारंपरिक पद्धतीने सोयाबीनचे उत्पादन घेते होते. मात्र, सोयाबीनमधून येणारे उत्पन्न अत्यल्प असल्याने या शेतकऱ्यांनी फ्लॉवर शेतीचा (Cauliflower Cultivation) मार्ग निवडला. त्यामुळे त्यांच्या वार्षिक उत्पन्नात 10 पटीने वाढ झाल्याचे ते सांगतात. या ठिकाणी उत्पादित होणारा फ्लॉवर प्रामुख्याने युपी, दिल्ली आणि महाराष्ट्रात विक्रीस पाठवला जात आहे. याशिवाय जबलपूर, लखनऊ येथील व्यापाऱ्यांकडून सर्वाधिक मागणी असल्याचे शेतकरी सांगतात.

विशेष म्हणजे शेतकऱ्यांना आपला फ्लॉवर विक्री करण्यासाठी बाजार समितीत जावे लागत नाही. व्यापारी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन थेट फ्लॉवरची खरेदी करत आहे. यासाठी उत्तरप्रदेशातील व्यापारी गावागावांमध्ये फिरून शेतकऱ्यांसोबत खरेदी व्यवहार करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाचण्यास मदत होत असून, ते आपला पूर्ण वेळ फ्लॉवरची देखरेख आणि शेतातील अन्य कामांवर लक्ष केंद्रित करत आहे.

मध्यप्रदेश-उत्तरप्रदेशातील शहरांमध्ये मोठी मागणी- Cauliflower Cultivation

शेतकरी सांगतात की, भाजीपाला शेती करण्यासाठी महिला आणि मुलांचेही साहाय्य मिळत असल्याने भाजीपाला शेतीतुन चांगले उत्पन्न मिळत आहे. मध्यप्रदेशातील जबलपुर, छिंदवाड़ा, सिवनी आणि बालाघाट बाजारात फ्लॉवरला मोठी मागणी आहे. याशिवाय मध्यप्रदेशातील इलाहाबाद, रायबरेली, लखनऊ आणि हरदोई येथेही नियमित फ्लॉवर पाठवला जात आहे. एका पिक अप मध्ये साधारणपणे 30 क्विंटल फ्लॉवर पाठवला जातो. दिवसाला गौरझामर येथून जवळपास 4-5 आयशर गाड्या लोड होत असल्याचे शेतकरी सांगतात.

एकरी दोन लाख रुपये नफा –

शेतकरी शिवप्रसाद पटेल सांगतात, एक एकर फ्लॉवर लागवडीसाठी एकरी 30 हजार रुपये खर्च येतो. त्याद्वारे येणाऱ्या उत्पन्नातून जवळपास दोन लाख रुपये निव्वळ नफा होतो. यापूर्वी सोयाबीनची शेती करताना मोठे नुकसान सोसावे लागत होते. एकरी 5-6 क्विंटल होणाऱ्या सोयाबीनचे केवळ 25 ते 30 हजार रुपये उत्पन्न मिळत होते. मात्र आता भाजीपाला शेतीतून आपणास यशाचा मार्ग मिळाला असल्याचे ते सांगतात.

error: Content is protected !!