Onion Rate : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! केंद्र सरकारकडून कांद्यावर निर्यात शुल्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली (Onion Rate) : टोमॅटोपाठोपाठ कांद्याचे भाव वाढण्याची भीती असताना सरकारने त्याला आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे. कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर ४० % शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेतलाय. अर्थ मंत्रालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. निर्यात शुल्काचा आदेश ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू राहील.

तुमच्या शेतमालाचा रोजचा बाजारभाव कसा चेक करायचा?

शेतकरी मित्रांनो आता आपल्या जवळच्या कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव चेक करणे अगदी सोपे झाले आहे. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. इथे तुम्हाला रोजच्या बाजारभावासोबतच हवामान अंदाज, जमीन मोजणी, सातबारा उतारा डाउनलोड करणे, जमीन खरेदी विक्री, सरकारी योजना आदी गोष्टींचा फायदा घेता येतो. तेव्हा आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं सर्च करा आणि या सेवेचे लाभार्थी बना.

देशात कांद्याचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी निर्यात शुल्कात वाढ करण्यात आलीय. कांद्याच्या दरात काहीशी सुधारणा होत असताना देशात कांद्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर जास्तीचं शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलाय. मात्र शेतकर्‍यांनी सरकारच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अर्थ मंत्रालयाने एका अधिसूचनेत म्हटले आहे की ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने निर्यात शुल्क लावण्यात आले आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (CBIC) नुसार, हा निर्णय सार्वजनिक हितासाठी घेण्यात आला आहे. याआधी सरकारने गहू आणि तांदळाच्या निर्यातीवरही बंदी घातली होती.

error: Content is protected !!