Charcoal Fertilizer : असा करा पिकांसाठी घरगुती कोळशाचा वापर; उत्पादनात होईल भरघोस वाढ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ग्रामीण भागामध्ये विशेषतः शेतकऱ्यांकडे चूल (Charcoal Fertilizer) प्रत्येकाकडे असते. त्यामुळे रोजच्या दैनंदिन जळाऊ लाकडामधून मोठ्या प्रमाणात कोळसा जमा होतो. हाच कच्चा कोळसा शेतातील पिकांसाठी खूप बहुउपयोगी असतो. शेती करताना शेतकऱ्यांना खतांची बऱ्याच प्रमाणात गरज पडते. त्यामुळे असा आपल्याकडील कोळसा इतरत्र थोड्या पैशांसाठी विक्री न करता शेतातील पिकांसाठी वापरल्यास तुम्हाला त्या पिकांच्या उत्पादकतेच्या माध्यमातून अधिक फायदा होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर आज आपण लाकडी कोळशाच्या (Charcoal Fertilizer) गुणवैशिष्ट्यांबाबत जाणून घेणार आहोत.

काय आहे कच्चा कोळसा? (Charcoal Fertilizer For Crops)

कच्चा कोळसा म्हणजेच बायोचार (Charcoal Fertilizer) हा सेंद्रिय कोळशाचा एक प्रकार आहे. जो लाकूड, पालापाचोळा, जैविक अवशेष यांच्या जळणातून तयार होत असतो. अर्थात या कार्बोनिक पदार्थांपासून कोळसा तयार होण्याच्या या प्रक्रियेला पायरोलिसिस असे म्हटले जाते. त्यामुळे या जळाऊ कच्चा कोळशाचा उपयोग मातीच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी वापरला जातो. झाडांच्या किंवा पिकांच्या वाढीसाठी हा कच्चा कोळसा उपयुक्त मानला जातो.

कच्च्या कोळशाने काय होते?

जेव्हा तुम्ही काही पिकांसाठी खतांसोबतच (Charcoal Fertilizer) तुमच्याकडे उपलब्ध असेल त्या प्रमाणात कोळसाचा वापर करता. तेव्हा अशा जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. फळबाग शेतीमध्ये कोळशाचा प्रभावी वापर केला जाऊ शकतो. कारण कोळसा आपल्या छिद्रांमध्ये अधिक काळ पाणी धरून ठेवतो. त्यामुळे शेतकरी फळबाग शेती दरम्यान झाडांच्या मुळांजवळ कोळशाचा वापर करून, नेहमी ओलावा टिकवून ठेऊ शकतात. हा कोळसा जमिनीतील पाणीधारण क्षमतेसह पोषकतत्वांच्या वाढीसाठी मदत करतो. इतकेच नाही तर कोळशाच्या वापरामुळे पिकांच्या खोलवर वाढ होण्यासाठी मदत होते. ज्यामुळे पिकांच्या रोगप्रतिकार क्षमतेत वाढ होण्यास मदत होते.

अन्य महत्वाचे उपयोग?

कोळसा मातीची उत्पादकता सुधारण्यास मदत करतो. कोळसा आणि जैविक सामग्री जसे की, गायीचे शेण, वर्मी कंपोस्ट खत, कोकोपीट या सेंद्रिय खतांच्या मिश्रण तयार करावे. खाद किंवा जैविक खतांमध्ये कोळसा मिक्स केल्याने पोषक तत्वे, पाणी आणि मातीतील सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी मदत होते. ज्यामुळे मातीच्या उत्पादकतेत वाढ होऊन, पिकांचा विकास होण्यास मदत होतो. याशिवाय पर्यावरणीयदृष्ट्या देखील शेतीमध्ये कोळसा वापराचे विशेष महत्व आहे. ज्यामुळे ग्रीनहाऊस गॅसचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होते.

error: Content is protected !!