Chia Seed Cultivation: चिया सीड लागवडीतून शेतकर्‍यांना दुप्पट उत्पन्नाची संधी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Chia Seed Cultivation: चिया, किंवा मेक्सिकन चिया, हे भारतीय शेतकर्‍यांसाठी नवीन पीक असले तरी पोषक घटकांनी समृद्ध या बियाण्यांचे आहारातील महत्व यामुळे चिया बियाण्यांची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. चिया लागवडीतून शेतकर्‍यांना खर्चापेक्षा दुप्पट उत्पन्न (Grow Chia To Earn Twice) मिळू शकते. पोषक तत्वांनी समृद्ध, चिया पि‍काला अत्यंत कमी देखभाल लागते. हे पीक रोग व किडीपासून मुक्त राहते, त्यामुळे चिया लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानाची चिंता करण्याची गरज नाही.

सध्या भारतात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि हरियाणामध्ये या पिकाची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड (Chia Seed Cultivation) केली जात आहे. सेंद्रिय पद्धतीने (Organic Farming) या पिकाची लागवड करणे उत्पन्नाच्या दृष्टीने उत्तम असते. चिया पिकाच्या लागवडीतील (Chia Seed Cultivation Practices) महत्वाचे मुद्दे जाणून घेऊ या.

 • चिया हे पीक मध्यम सुपीक आणि चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत सहज उगवते या पिकात आम्लीय माती मोठ्या प्रमाणात सहन करण्याची क्षमता आहे. परंतु अधिक क्षारयुक्त जमिनीत पिकाचे उत्पादन कमी होते. चांगल्या उत्पादनासाठी वालुकामय चिकणमाती माती सर्वात योग्य आहे.
 • भारतात चिया पेरणीसाठी सर्वोत्तम काळ (Best Sowing Time) 5 ते 25 ऑक्टोबर पर्यंत आहे. पेरणीच्या वेळी, 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमान बियांच्या चांगल्या उगवणासाठी सर्वात योग्य आहे. हे पीक थंडीसाठी अत्यंत संवेदनशील असले तरी, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याची  थंडी या पिकासाठी पोषक आहे.
 • शेत तयार करण्यासाठी खोल नांगरणी व एक कुळवणी पुरेशी आहे.
 • पेरणीसाठी चांगल्या प्रतिचे बियाणे वापरावे. प्रामुख्याने चिया बियाण्यांचे काळे आणि पांढरे (Black And White Chia Seed) असे दोन प्रकार आहेत. 2.5 ते 3 किलोग्रॅम बियाणे प्रति एकर लागवडीसाठी पुरेसे आहेत.  
 • चियाची पेरणी सीड ड्रिल किंवा पेरणी यंत्राने (Chia Seed Cultivation) करता येते. पेरणीच्या वेळी दोन ओळीतील अंतर ३० ते ४५ सें.मी. व  रोपातील अंतर ३० सेमी अंतर ठेवावे.
 • चिया पिकाचे योग्य पोषण होऊन चांगले उत्पादन मिळविण्यासाठी हेक्टरी १०-१५ टन चांगले कुजलेले शेणखत जमीन तयार करतांना द्यावे. हलक्या जमिनीत पेरणीच्या वेळी 20-30 किलो नत्र, 20-25 किलो स्फुरद आणि 15-20 किलो पोटॅश प्रति हेक्‍टरी देणे झाडांच्या आवश्यक वाढीसाठी फायदेशीर ठरते. गरजेनुसार 10 किलो नत्र प्रति हेक्‍टरी पेरणीनंतर 30-45 दिवसांनी द्यावे.
 • बियाणे अंकुरित होण्याच्या काळात मातीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे. वालुकामय किंवा वालुकामय चिकणमाती जमिनीत पेरणी केल्यानंतर साधारणपणे 4-5 वेळा पाणी द्यावे लागते. परंतु चिया पीक पक्व होण्याच्या कालावधीत पि‍काला पाणी देऊ नये.
 • या पि‍काला तणांचा आणि किडी व रोगांचा त्रास होत नाही तरी सुरुवातीला २५ ते ३० दिवस शेत तणमुक्त ठेवावे.
 • चिया हे पीक थंडीसाठी जास्त संवेदनशील असल्यामुळे जास्त थंडीत जमिनीला हलके सिंचित करणे फायद्याचे ठरते.
 • चिया पीक १२०-१३० दिवसांत काढणीसाठी तयार होते. यावेळी पिकाची सर्व पाने गळून पडतात. पिकाची काढणी हिवाळ्यातच, म्हणजे झाडे सुप्त अवस्थेत असतांना करावी.
 • पिकाची कापणी विळ्याने किंवा मशीनने करता येते. त्यानंतर लाकडी काठीने मळणी करावी.
 • चियाचे प्रति एकर सरासरी उत्पादन 350-400 किलो बियाणे एवढे येते. शेतकऱ्यांना चिया पिकाच्या लागवडीतून (Chia Seed Cultivation) भरघोस उत्पन्न मिळू शकते. गरज आहे फक्त या पिकाचे शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करण्याची
error: Content is protected !!