Chicken Rate: आगामी निवडणूक आणि रमजानच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात कोंबडीच्या दरात विक्रमी वाढ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्यामहाराष्ट्रात करार पद्धतीने कुक्कुटपालन (Chicken Rate) करणाऱ्या व्यावसायिकांना 150 रुपये प्रति किलो असा विक्रमी दर मिळाला आहे. विशेष म्हणजे ही देशातील सर्वाधिक किंमत आहे. आगामी लोकसभा निवडणूक आणि रमजान यामुळे देशात कोंबडीची मागणी (Chicken Rate) वाढली आहे असे म्हटले जात आहे.  

राजकीय पक्षांकडून इफ्तार पार्टीसाठी (Iftar Party) चिकनची मागणी वाढली आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या तेलंगणात चिकनचा दर (Chicken Rate) 135 ते 140 रुपये असताना महाराष्ट्रात 150 रुपये दर मिळत आहे. देशात यापूर्वी 142 रूपयांपर्यंत दर होते, आता ते 150 रूपयांवर पोहोचले आहेत. कमी पुरवठा आणि वाढत्या मागणीमुळे दरात वाढ झाली आहे. उन्हाळ्यात कोंबड्यांच्या व्यवस्थापनावर (Poultry Management In Summer) अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. भविष्यातही दर चांगले राहण्याची शक्यता आहे.

तापमान वाढल्याने कोंबड्यांच्या व्यवस्थापनात अडचणी निर्माण होतात. उष्णतेमुळे कोंबड्या धापा टाकतात आणि अन्न व पाणी कमी ग्रहण करतात. यामुळे वजन कमी होते आणि मरतुकीचे प्रमाण वाढते.

हिवाळ्यात एका पक्ष्याचे वजन वाढण्यासाठी 80 रुपये खर्च येतो. उन्हाळ्यात हाच खर्च 110 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचतो. कारण उन्हाळ्यात तापमान नियंत्रणासाठी उपाय योजनांवर खर्च वाढतो. यंदा तापमान वाढल्याने कुक्कुटपालन व्यवसायात मरतूक वाढली आहे

 पक्ष्यांची संख्या कमी आणि मागणी अधिक, त्यामुळे दरात (Chicken Rate) वाढ होत आहे. त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायात (Poultry Farming) उष्णतेचा सामना करण्यासाठी योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे. उन्हाळ्यात कुक्कुटपालनासाठी तापमान नियंत्रण (Temperature Management) महत्त्वाचे आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणावर करार पद्धतीने कुक्कुटपालन (Contract Poultry Farming) होते. करारदार कंपन्यांचे दर 150 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे सुद्धा कोंबडीच्या दरात वाढ (Chicken Rate) झाल्याचे दिसून येते.

error: Content is protected !!