Chilli Cultivation: मिरची रोपांचे कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्याने वापरला कागदी ग्लासचा फंडा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी सुद्धा त्यांच्या शेतात नवनवीन प्रयोग (Chilli Cultivation) करताना दिसतात. असाच एक प्रयोग सुरेश नलावडे आणि हरी नलावडे यांनी केला आहे.

रामनगर येथील या दोन शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतात मिरचीचे पीक (Chilli Crop) घेतले. मिरचीची लागवड त्यांनी मल्चिंग पेपरवर (Mulching Paper) करायचे ठरविले. पण त्यांच्या लक्षात आले की मल्चिंग पेपर उन्हामुळे खूप तापतो त्यामुळे मिरचीची रोपे (Chilli Seedlings) कोमेजून तर काही रोपे वाळून जातात. त्यावर उपाय म्हणून या दोन शेतकर्‍यांनी शेतातील मिरची रोपटे लागवडीसाठी मल्चिंग पेपर सोबत कागदी ग्लासचा (Paper Glass) वापर करणे सुरू केले आहे. या कागदी ग्लासचे बूड काढून टाकले जाते. कागदी ग्लासच्या आवरणामुळे मिरची रोपाचा अतिरिक्त उष्णतेपासून बचाव होतो. हे ग्लास पंधरा दिवस पर्यंत टिकते. पंधरा दिवसांनंतर मिरचीचे (Chilli) रोप वाढीस लागलेले असतात (Chilli Cultivation).

नलावडे यांनी या कागदी ग्लासचा वापर करून तीस गुंठे जमिनीत सहा हजार मिरचीची रोपे (Chilli Cultivation) लावली असून प्रति ग्लास तीस पैसे, इतका खर्च त्यांना आला आहे. सध्या परिसरात विहिरींना कमी पाणी असून उपलब्ध पाण्यातही उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना करावा लागत आहे. 

लागवड केलेली मिरचीचे रोपटे कडक उन्हामुळे कोमेजून जाऊ नये म्हणून मल्चिंग पेपर सोबत कागदी ग्लासचा वापर या परिसरातील शेतकर्‍यांसाठी नवीनच कल्पना होती. त्यामुळे या दोन शेतकर्‍यांनी केलेल्या या प्रयोगाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.  

मल्चिंग पेपरमुळे होतात हे फायदे (Mulching Paper Uses)

कमी पाऊस आणि उन्हाचा वाढता पारा यामुळे शेतकरी बांधवांना रोप सुकु नये यासाठी मल्चिंग पेपरचा वापर करावा लागतो. मल्चिंग पेपरमुळे खालीलप्रमाणे फायदे होतात.

  • मल्चिंगच्या मदतीने भाजीपाल्यासह अनेक पिकांची शेती करणं शक्य आहे.
  • मल्चिंग पेपरमुळे तणांची वाढ होत नाही. परिणामी खर्चात कपात होते.
  • पिकाला पाणी दिल्यानंतर बाष्पीभवनाने उडून जात नाही. पाण्याची बचत होते व मातीत ओलावा टिकून राहतो.
  • आच्छादन पेपरच्या खाली सुक्ष्म वातावरण निर्मिती होते. ज्यामध्ये जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारतात व उगवण 2 ते 3 दिवस लवकर होते.
error: Content is protected !!