Chilli Farming : ‘या’ आहेत हिरव्या मिरचीच्या पाच प्रमुख प्रजाती; वाचा.. वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय आहारात हिरव्या मिरचीला (Chilli Farming) मोठे स्थान आहे. हिरवी मिरची नसेल तर भारतीय आहाराला चव येत नाही. हिरव्या मिरचीची शेती जवळपास जगातील सर्वच देशांमध्ये केली जाते. तर भारतातील सर्वच भागातील वातावरणात हिरव्या मिरचीचे उत्पादन घेतले जाते. भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, केरळ, गुजरात, झारखंडसह अनेक राज्यांमध्ये हिरव्या मिरचीचे (Chilli Farming) उत्पादन होते.

हिरव्या मिरचीला (Chilli Farming) बाजारात नेहमीच मागणी असते. ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यातून मोठया प्रमाणात नफा मिळतो. हिरव्या मिरचीचे चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी, चांगले उत्पादन होण्याची आवशक्यता असते. तर चांगले उत्पादन मिळण्यासाठी उत्तम प्रजातीची निवड करणे तितकेच महत्वाचे असते. याच पार्श्वभूमीवर आज आपण हिरव्या मिरचीच्या पाच प्रमुख प्रजातींबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला भरघोस उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे.

हिरव्या मिरचीच्या प्रमुख प्रजाती (Chilli Farming Top Five Variety In India)

१. बायोसीड अजंता हॉट : बायोसीड अजंता हॉट ही हिरव्या मिरचीची एक आधुनिक प्रजाती आहे. हे वाण विषाणूजन्य रोगांसाठी सहनशील असून, या प्रजातीचे फळ किडींपासून सुरक्षित राहते. या मिरचीचा रंग लाल असतो. या प्रजातीच्या ताज्या मिरच्यांचा रंग हिरवा असतो. या प्रजातीचे फळ खूप आकर्षक असते. या प्रजातीच्या एका मिरचीचे वजन साधारणपणे 6 ते 7 ग्रॅम इतके असते. या प्रजातीची मिरची ही खूप तिखट असते. या प्रजातीच्या मिरच्या बऱ्याच प्रमाणात मसाला बनवण्यासाठी वापरल्या जातात.

२. महिको तेज 4 : महिकोच्या या प्रजातीच्या मिरचीचा उपयोग हा सर्वाधिक भाजीपाला आणि मसाल्यांसाठी होतो. या प्रजातीचे फळ लाल रंग आणि चमकदार असते. या मिरचीच्या प्रजातीपासून शेतकऱ्यांना उत्पादन देखील अधिक मिळते. ही मिरची दिसायला आकर्षक असल्याने तिला बाजारात चांगला दर देखील मिळतो. ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक कमाई होण्यास मदत मिळते. हिरव्या मिरचीची (Chilli Farming) ही प्रजाती रोग आणि किडींच्या प्रादुर्भावास बळी पडत नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांना या प्रजातीच्या लागवड केल्यास कीटकनाशकांवर अधिकचा खर्च करावा लागत नाही. या प्रजातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी 90 ते 160 क्विंटल उत्पादन मिळते.

३. सिजेंटा हॉट एचपीएच 5531 : या प्रजातीच्या मिरचीचे रोप खूप टणक असते. ही मिरची लवकर तोडणीला येते. ज्यामुळे शेतकऱ्यांना लवकर उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते. या प्रजातीच्या मिरचीमध्ये मध्यम तिखटपणा असतो. प्रजातीची मिरची ही 15 सेमीपर्यंत लांब वाढू शकते. तर या वाणापासून हेक्टरी 90 ते 140 क्विंटल उत्पादन मिळते. हे वाण खरीप हंगामात लावले जाते.

४. ननहेम्स इंदु एफ 1 हायब्रिड हॉट पेपर : हिरव्या मिरचीची ही प्रजाती अधिक उत्पादन मिळवण्यासाठी ओळखली जाते. याशिवाय एक्स्पोर्ट माल मिळवण्यासाठी ही मिरची सर्वोत्तम मानली जाते. या वाणाची मिरची अधिक काळापर्यंत ताजी राहते. मिरचीचे हे वाण अधिक उत्पादन देण्यासाठी ओळखले जाते. या प्रजातीची लागवड खरीप आणि रब्बी अशी दोन्ही हंगामात केली जाते.

५ . वीएनआर राणी 332 एफ1 हायब्रिड : वीएनआर राणी 332 एफ1 हायब्रिड हे मिरचीचे वाण सर्वोत्तम मानले जाते. चांगली गुणवत्ता आणि अधिक उत्पादन ही या वाणाची ओळख आहे. हे वाण लवकर तोडणीला येते. ज्यामुळे शेतकऱ्यांना लवकर उत्पादन मिळण्यास मदत होते. हिरव्या मिरचीची ही प्रजाती खूप तिखट मानली जाते. या वाणाच्या मिरचीची लांबी 12 ते 15 सेमी इतकी असते. या वाणाच्या मदतीने शेतकरी हेक्टरी 80 ते 150 क्विंटल उत्पादन मिळवू शकतात.

error: Content is protected !!