Chilli Variety : ‘पूसा सदाबहार’ वाणाद्वारे करा हिरवी मिरची लागवड; वाचा ‘या’ वाणाची वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रीयन आहारात हिरव्या मिरचीला (Chilli Variety) एक महत्वाचे स्थान आहे. शेतकरी तर आवडीने हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कांदा भाकरी म्हणून आहारात आवडीने समावेश करतात. इतकेच नाही तर रोजच्या आहारात खाल्ली जात असल्याने, हिरव्या मिरचीला बाजारात नेहमीच मागणी पाहायला मिळते. विशेष म्हणजे मिरचीची लागवड खरीप आणि रब्बी अशी दोन्ही हंगामात केली जाते. ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळवण्यास मदत होते. त्यामुळे आता तुम्ही देखील एखादया नगदी पिकाच्या शेतीकडे वळण्याचा विचार करत असाल तर हिरवी मिरची लागवड (Chilli Variety) तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरणार आहे.

घरपोच मिळते बियाणे (Chilli Variety Pusa Sadabahar For Farmers)

शेतकरी राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या (एनएससी) माध्यमातून ‘पूसा सदाबहार’ या अत्याधुनिक वाणाचे बियाणे मिरची लागवडीसाठी (Chilli Variety) घरपोच मागवू शकतात. ज्यामुळे शेतकऱ्यांना एनएससीकडून खात्रीशीर बियाणे मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी शेतकरी प्रामुख्याने राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या https://www.mystore.in/en/product/crop-nsc-chilli-variety-pusa-sadabahar या संकेतस्थळावर जाऊन पुसा सदाबहार या हिरव्या मिरची वाणाचे बियाणे मागवू शकतात.

‘पूसा सदाबहार’ वाणाची वैशिष्ट्ये

‘पूसा सदाबहार’ हे प्रामुख्याने हिरव्या मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन देणारे वाण म्हणून प्रचलित आहे. विशेष म्हणजे हे वाण बाराही महिने लागवड करण्यास शिफारस करण्यात आले आहे. या वाणाच्या एका मिरचीच्या झाडाला एका गुच्छाला प्रामुख्याने 6-22 मिरची येतात. या वाणाच्या मिरचीच्या झाडाला वर्षातून दोन ते तीन वेळा बहार येतो. हे वाण सामान्यपणे 150 ते 200 दिवसांमध्ये तयार होते. या वाणापासून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 35 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. त्यामुळे आता तुम्ही देखील या वाणाच्या मदतीने हिरवी मिरची लागवड करू इच्छित असाल तर तुम्हाला 25 ग्रॅम बियाणाच्या एका पाऊचची किंमत 31 टक्के सूट देत 37 रुपयांमध्ये राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून मिळणार आहे.

कशी करतात लागवड

हिरव्या मिरचीच्या लागवड तुम्ही वर्षभर करू शकतात. ज्यामुळे तुम्हाला मिरचीच्या शेतीकडे विशेष लक्ष द्यावे लागते. त्यामुळे तुम्ही हिरव्या मिरचीच्या रोपे तयार करण्यासाठी छोटेखानी घरच्या घरी नर्सरीचे वातावरण तयार रोपे बनवू शकतात. पुसा सदाबहार या वाणाच्या मिरचीच्या रोपांची लागवड प्रामुख्याने दोन दोन फूट अंतर ठेवून करावी. तसेच दोन बेडमधील अंतर हे 3 फूट इतके ठेवावे. दोन झाडांमध्ये योग्य अंतर असेल तर रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहण्यास मदत होते. अर्थात बियाण्यापासून रोपे तयार करण्यापासून ते मिरचीला काढणीला येईपर्यंत जवळपास 9 ते 10 महिन्यांचा कालावधी लागतो.

error: Content is protected !!