Chocolates For Cow: गायी म्हशींना सुद्धा आवडते चॉकलेट; खरं वाटत नाही, मग हे वाचा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत (Chocolates For Cow) सर्वांना आवडणारी वस्तू म्हणजे चॉकलेट! आनंदाच्या वेळी चॉकलेटने तोंड गोड करणे असो की भेटवस्तू देणे चॉकलेटला नेहमीच प्राधान्य देण्यात येते. पण आम्ही जर तुम्हाला सांगितलं की गायी म्हशी यांना सुद्धा चॉकलेट (Chocolates For Cow) खूप आवडते आणि ते खाऊन ते भरपूर दूध देतात तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. चला तर जाणून घेऊ याविषयी.

भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था बरेलीच्या शास्त्रज्ञांनी दूध देणाऱ्या जनावरांसाठी ‘यूएमएमबी चॉकलेट’ (UMMB Chocolate) तयार केले आहे. गाई-म्हशींना हे चॉकलेट्स (Chocolates For Cow) दिल्याने त्यांना खूप भूक लागते. भुकेमुळे ते अधिक अन्न खातात आणि आणि त्यांची पचन क्षमता सुद्धा वाढते. एवढेच नाही तर चॉकलेटमुळे दुभत्या जनावरांमध्ये दूध देण्याची क्षमता सुद्धा वाढते. हे चॉकलेट अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असून  चॉकलेट फक्त रवंथ (Ruminant Animals) करणारे प्राणीच खाऊ शकतात.

अनेक वेळा दुधाळ जनावरे आजारपणामुळे किंवा कोणत्याही प्रकारच्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे दूध उत्पादन (Milk Production) कमी करतात. जनावरांचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी पशुपालक वेगवेगळ्या हानिकारक पद्धतींचा अवलंब करतात. यामुळे जनावरांच्या आरोग्याला धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. अनेक वेळा अधिक दूध उत्पादनाच्या हव्यासापोटी तो जनावरांना असे इंजेक्शनही देतो, जे त्याच्या गुरांसाठी हानिकारक आहे. अशा परिस्थितीत बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेने बनवलेले हे ‘यूएमएमबी चॉकलेट’ (Chocolates For Cow) प्राण्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते.

चांगले पचन, अधिक दूध उत्पादन
गायी आणि म्हशींना UMMB पशु चॉकलेट दिल्याने त्यांना खूप भूक लागते. भुकेमुळे ते अधिक अन्न खाण्यास सक्षम असतात आणि ते पचवतात. चांगला आहार आणि योग्य पचनसंस्थेमुळे जनावरांची दूध उत्पादनाची क्षमता वाढते.

पोषक घटकांनी युक्त चॉकलेट (Chocolates For Cow)

भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेनुसार, बरेली, कोंडा, मोहरी, युरिया, कॅल्शियम, मॅग्नेशियम, जस्त, तांबे, मीठ इत्यादींचा वापर  करून हे चॉकलेट बनविले आहे. त्यातून जनावरांना पोषक तत्वे मिळतात. त्यामुळे प्राणी दीर्घकाळ निरोगी राहतात.

error: Content is protected !!