मोसंबीच्या फळगळीचा शेतकर्‍यांना बसणार फाटका; उत्पादन घटणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : मराठवाड्याचे प्रमुख फळ पीक म्हणून मोसंबी कडे पाहिले जाते. जवळपास 40 हजार हेक्‍टरवर मराठवाड्यात मोसंबीचे क्षेत्र विस्तारलेले आहे. तर जालना जिल्ह्यातल्या मोसंबीला जी आय मानांकन देखील प्राप्त आहे. मात्र यंदा चे उत्पादन फळगाळी मुळे घटणार असल्याचे चिन्ह आहे.

मार्च महिन्यात आताच्या तुलनेत तापमान थोडं कमी असलं तरी फळगळ मात्र 40 ते 60 टक्‍क्‍यांपर्यंत झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. शिवाय लांबलेल्या आणि अवेळी पावसाने काही बागांचे ताणाचे तंत्रही बिघडले आहे. ताण व्यवस्थित न बसणे सोबतच थंडीचा अत्यल्प कालावधीत दोन बहर यांचा अट्टाहास यामुळे अनेक भागात बागा अपेक्षेनं रूप फुटल्याच नसल्याचे चित्र आहे. उशीराने फुटलेल्या बागांमध्ये ही फळगळ जास्त आहे.

त्यामुळे हंगाम मध्यम राहण्याची शक्यता आहे दर वर्षीच्या तुलनेत ही फळगळ थोडी जास्तच असल्याने उत्पादनात 25 ते 30 टक्‍क्‍यांपर्यंत घटीचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. अर्थात उत्पादन घडल्यास त्यानंतर दर काय पदरात पडतात यावर मोसंबी उत्पादकांचा अर्थकारण अवलंबून राहणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!